BJP workers at Sakri
BJP workers at Sakri Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

विकास कामे वगळल्याने भाजपचे नगरसेवक नाखुष?

Sampat Devgire

धुळे : साक्री नगरपंचायतीत (Sakri Municiple council) परिवर्तनातून प्रथमच बहुमताने भाजपची (BJP) सत्ता स्थापन झाली. यानंतर नगरसेवकांनी (Corporators) विकास कामांकडे लक्ष केंद्रीत केले. त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागातर्फे विविध विकास कामांसाठी साडेसहा कोटींचा निधी मिळावा म्हणून निकषानुसार प्रस्ताव सादर केला. नेमकी मान्यता अडली कुठे आणि माशीही शिंकली कुठे याचा शोध नाराज नगरसेवकांकडून घेतला जात आहे.

साक्री येथील निवडणुकीतून नगरपंचायतीच्या १७ जागांमध्ये ११ भाजपला, चार शिवसेना, काँग्रेस व अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. यानंतर जिल्हा नियोजन विभागाकडून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत साडेसहा कोटींच्या निधीतून विकास कामांना मंजुरी मिळावी, यासाठी रीतसर प्रक्रियेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन विभागाकडे प्रस्ताव सादर झाले.

जिल्हा नियोजन विभागाकडे शासनाच्या निर्देशानुसार महिला भवन उभारण्यासाठी सहा कोटी ३० लाखांचा निधी राखीव होता. महिला भवन उभारले जाणार नसल्याने राखीव निधीतून साक्री नगरपंचायतीसाठी विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लावले जावे, अशी सत्ताधारी नगरसेवकांकडून मागणी झाली.

या विकास कामांचे प्रस्ताव

या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने एस्टिमेट, पाच कोटी वीस लाखांच्या तांत्रिक मंजुरीसह पंधरा कामांसाठी अंदाजित सहा कोटी ६२ लाख २६ हजार ५१६ रुपयांच्या निधीचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी नगर प्रशासन विभागाकडे सादर झाले. त्यात विविध प्रभागांच्या विकासकामांचा समावेष आहे. ही कामे रखडल्याने विजयाच्या आनंदात असलेल्या नगरसेवकांत निराशा आहे.

‘प्रमा’च प्राप्त झाली नाही

यासंदर्भात जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी सांगितले, की साक्री नगरपंचायतीकडून विकास कामांसाठी निधीची मागणी झाली. मात्र, नगर प्रशासन विभागाकडून संबंधित प्रस्तावांवर प्रशासकीय मान्यतेचा निर्णय घेतला जातो. यानंतर ही मान्यतेची पत्र जिल्हा नियोजन विभागाला नियमानुसार प्राप्त झाली तर निधी देता येतो. साक्री नगरपंचायतीबाबत प्रशासकीय मान्यतेची प्रत प्राप्त झाली नसल्याने निधी देता आलेला नाही.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT