राजमाता कल्पनाराजे भोसलेंनी दिली नरहरी झिरवाळांना कौतुकाची थाप!

सुरगाण्यात पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी दोघेही करणार पाठपुरावा.
Narhari Zirwal & Kalpanaraje Bhonsale
Narhari Zirwal & Kalpanaraje BhonsaleSarkarnama
Published on
Updated on

दिंडोरी : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचा साधेपणा हा त्यांचा `युएसपी` बनला आहे. त्यांचा हा स्वभाव त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असतो. अनेक नेते त्यांच्या या साधेपणाचे कैतुक केल्या शिवाय रहात नाहीत. आता त्यात सातारच्या छत्रपती घराण्याच्या राजमाता कल्पनाराजे भोसले (Kalpanaraje Bhonsale) यांची भर पडली आहे. कल्पनाराजे भोसले यांनी झिरवाळ यांचे कौतुक करीत आदिवासींसाठी (Trible Devolopment) काय करणार? असा प्रश्न केला.

Narhari Zirwal & Kalpanaraje Bhonsale
महिला अधिकाऱ्याचा विनयभंग : उपवनसंरक्षकावर गुन्हा दाखल

अक्षय तृतीयेचा सण आदिवासी बांधव उत्साहात साजरा करतात. या निमित्ताने अनेक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम होतात. त्यात सर्वच सहभागी होत असतात. यानिमित्ताने राजमाता कल्पनाराजे भोसले आपल्या माहेरी सुरगाणा येथे आल्या होत्या. यावेळी त्यांची विधानसभेचे प्रभारी सभापती नरहरी झिरवाळ यांच्याशी भेट झाली. त्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी राजमाता कल्पनाराजे यांनी झिरवाळ यांच्या पाठीवर थाप देत त्यांचे कौतुक केले.

Narhari Zirwal & Kalpanaraje Bhonsale
सभांचा भोंगा : उद्धव ठाकरेंनी राज यांचे चॅलेंज स्वीकारले; फडणविसांनाही उत्तर देणार!

पाचोरे वणी (ता. दिंडोरी) येथील खंडेराव महाराज मंदीर भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी श्री. झिरवाळ यांची साधी राहणी राजमाता कल्पनाराजे भोसले यांना भावली. आदिवासी लोकप्रतिनिधींचा साधा, सऱळ स्वभाव राजघराण्यातील राजमाता कल्पनाराजे भोसले यांनाही प्रभावीत करून गेला. दोनवेळा झिरवाळ यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांनी कौतुक केले.

आदिवासी मातीशी नाळ जुळलेले दोन दिग्गज व्यक्तिमत्त्व नुकतेच एकत्र आले. यातील एक सुरगाण्याच्या माहेरवाशीन राजमाता कल्पनाराजे भोसले, तर दुसरे सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातून विधानसभेचे उपाध्यक्षपदी पोचलेले नरहरी झिरवाळ. दोघेही उच्चपदस्थ असले तरी आदिवासी बांधवांच्या उत्कर्षाची तळमळ मात्र तसूभरही कमी झालेली नाही. एका धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने दोघे एकत्र आले व‍‍ सुरगाण्यातील आदिवासी बांधवांचे आयुष्य समृद्ध करणे व परिसरात विकासाची पहाट उगविण्यासाठी पाणीयोजना राबविण्याचा निर्धार दोघांनी बोलून दाखविला.

सुरगाणा, पेठ, दिडोंरीचा अद्याप अपेक्षित विकास नाही. नागरिकांचा आर्थिक स्तर उंचवत नाही. ही खंत त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. याच विषयावर या दोघांत अनौपचापरिक संवाद झाला.

राजमाता भोसले यांनी सुरगाण्याच्या विकासासाठी तेथील आदिवासी बांधवाच्या प्रगतीसाठी काय केले पाहीजे, असा प्रश्‍न झिरवाळ यांना विचारला असता त्यांनी पाणीयोजने शिवाय जीवनमान उंचावणार नाही. फॉरेस्ट ॲक्टच्या समस्या सोडवून तेथील नागरिकांच्या हाताला रोजगार मिळायला हवा. काही नवे प्रकल्प आणले तर विकासाची पहाट होऊ शकेल, असे सांगितले.

राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. तुम्ही राज्यशासनाकडून प्रयत्न करा. मी खासदार उदयनराजेना सांगून केद्रातुन काही योजना आणता येईल का यासाठी प्रयत्न करते. अक्षयतृतीयेनिमित्त भोसले व झिरवाळ यांच्यातील सवांदाला मुर्त स्वरूप आले, तर आजचा दिवस आदिवासी बांधवासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा ठरेल.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com