Raj Thackeray & Amit Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP tweets ON Amit Thackeray : भाजपचा सल्ला अमित ठाकरेंना पचनी पडेल का?

BJP criticized MNS and Amit Thackeray On Samruddhi toll isssue-`भाजप`ने समृद्धी महामार्गाच्या टोलवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Sampat Devgire

MNS Toll attack News : `मनसे` नेते अमित ठाकरे यांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावरील गोंदे (सिन्नर) टोल नाक्यावर विलंब झाला. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर हल्ला करीत तोडफोड केली. याबाबत भाजपने टिका केली आहे. (BJP tweets on MNS attack on Samruddhi Highway toll Palaza)

यासंदर्भात `भाजप`ने (BJP) ट्वीट करीत अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना चिमटा घेतला आहे. सल्लाही दिला आहे. हा सल्ला मनसेचे (MNS) अमित ठाकरे यांना कितपत पचनी पडेल, की भाजपला मनसे स्टाईल उत्तर मिळेल याची उत्सुकता आहे.

याबाबत `भाजप`ने ट्वीट केले आहे. `अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा` यामध्ये भाजपने मनसेच्या पारंपारीक खळ्ळ खट्याकच्या राजकारणावर बोट ठेवत मोड तोड करायला अक्कल लागत नाही. काही नेव उभे करायला खुप कल्पकता व बुद्धी लागते असे तर सुचवलेले नाही ना?. असा प्रश्न पडतो. अर्थात राजकारणात नव्यानेच आलेल्या अमित ठाकरे यांना हा सल्ला कितपत मानवेल हे सांगता येत नाही. कदाचीत मानवणार नसण्याचीच शक्यता अधिक आहे.

मनसे विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमीत ठाकरे आणि काही पदाधिकारी शनिवारी (ता. २२) संध्याकाळी शिर्डी येथून सिन्नरकडे समृद्धी महामार्गाने येत होते. सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर त्यांचा ताफा आडवल्याने त्यांना आर्धा तास ताटकळत थांबावे लागले होते. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली.

याबाबत नाशिकचे शहराध्यक्ष ललित वाघ, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव शुभम थोरात, शशिकांत चौधरी, बाजीराव मते, स्वप्नील पाटोळे, मेघराज नवले, प्रतीक राजगुरू, शैलेश शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलीसांनी अटक केल्यावर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT