Bharat Gogawale News : भरत गोगावलेंना ठाकरेंच्या नेत्याने डिवचलं, "विस्तारच होणार नाही तर पालकमंत्रीचं कुठे घेऊन बसलात?"

Cabinet Expansion News: "गोगावलेंना मंत्रिपद देण्यात न आल्यामुळे त्यांना जास्तीचा विकास निधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला.."
Bharat Gogawale News :
Bharat Gogawale News :Sarkarnama

Mumbai News : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार अशी चर्चा सुरू असतानाच, हा विषय ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला. पुढील विस्तार हा पावसाळी अधिवेशनानंतरच होर्ईल, असे सांगण्यात आले. यामुळे आता शिंदे गट-भाजप तसेच अजित पवार गटातील (Ajit Pawar) आमदारांचा उर्वरीत मंत्रिपदावर डोळा असणार आहे. तसेच, पालकमंत्रीपदावरूनही सरकारमधील तीनही पक्षांतील मंत्री-आमदारांमध्ये रस्सीखेच आतापासूनच दिसून येते.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी कंबर कसून तयारीत असलेले शिंदेंचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्रीपदाच्या मुद्द्यावरून डिवचलं आहे. (Latest Marathi News)

Bharat Gogawale News :
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंच्या स्फोटक मुलाखतीचा दुसरा टिझर प्रदर्शित; लवकरच राजकीय धमाका?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये सर्वाधिक विकास निधी आमदार भरत गोगवले यांना देण्यात आल्याचे दिसून आले. गोगावलेंना मंत्रिपद देण्यात न आल्यामुळे त्यांना जास्तीचा विकास निधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला, अशीही चर्चा दिसून आली. यावर अंबादास दानवे यांनी गोगावलेंना पालकमंत्री पदावरून डिवचले आहे.

दानवे एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. यावेळी दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला की, "गोगावलेंना पालकमंत्री बनवता येत नाही, म्हणून त्यांना जास्तीचा निधी देवून त्यांची नाराजी दूर केली का? यावर उत्तर देताना दानवे म्हणाले की, "पुढचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही, हेच सांगता येत नाही. तुम्ही पालकमंत्रीपदाचं कुठे घेऊन बसलात? मंत्रिमंडळाचा विस्तारच होणार नसल्यामुळे पालकमंत्री होण्याचा प्रश्नच येत नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com