Shirdi BJP meeting  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi BJP Meeting : भाजप मंडलाध्यक्ष नियुक्त्या नियम डावलून? जिल्हाध्यक्ष पदासाठी शिंदे अन् विखे गटात कुरघोड्या; कार्याध्यक्ष चव्हाण शिर्डीत दाखल

Shinde vs Vikhe Factional Clash in District Race : मंडलाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून अहिल्यानगर जिल्ह्यात भाजप अंतर्गत वाद उफळला असून, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित शिर्डीत बैठक होत आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar BJP Office Bearers : राज्यात भाजप मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या सुरू आहे. स्थानिक नेत्यांमध्ये आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या मिळवून देण्याचा संघर्ष सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील भाजप संघटनेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटात वर्चस्वाची लढाई सुरू आहे.

मंडलाध्यक्ष ते जिल्हाध्यक्षपदावर आपलाच समर्थक विराजमान व्हावा, या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे आणि विखे पाटील गटात अंतर्गत राजकीय संघर्ष धुमसू लागला असताच, या सर्व पार्श्वभूमीवर भाजप कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण अहिल्यानगर दौऱ्यावर आहे. आमदार चव्हाण यांच्या उपस्थित शिर्डी इथं आज बैठक होत असून, त्यात राजकीय संघर्षाचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत.

भाजप कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित शिर्डीत (Shirdi) अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. अहिल्यानगरमध्ये मंडल अध्यक्ष नियुक्तीवरून वाद उफाळला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजप संघटनेत वर्चस्व दिसत आहे.

भाजपचे जुने पदाधिकारी या वर्चस्वावर चांगलेच नाराज झाले असून, पक्ष नेतृत्वांकडे तक्रार केल्या आहेत. कार्याध्यक्ष आमदार चव्हाण यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या असून, काही ठिकाणी त्यांनी स्वतः नियुक्तीला स्थगिती दिल्या आहेत. आता त्यांच्या उपस्थित शिर्डीत बैठक होत आहे.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये समर्थकांसाठी जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मंडलाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष आदी पदांच्या निवडीतून अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटले आहेत. श्रीरामपूरमध्ये फलकबाजीतून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात संगमनेर शहरात भाजपशी संबंधित नसलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याचा आरोप आहे. संगमनेर पूर्वमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी भाजपमध्ये घेत, पक्षाची सक्रिय सदस्याची अट पूर्ण केलेल्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने नाराजी आहे. संगमनेर पश्चिममध्ये देखील विखे समर्थकाची नियुक्ती झाल्याचा आरोप आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील चार मंडलाध्यक्षाची नियुक्ती पक्ष संघटनेचे सर्व नियम डावलून नियुक्ती झाली आहे.

श्रीरामपूरमध्ये नियुक्तीचा वाद बॅनरबाजीतून समोर आला आहे. पूर्वीचे काँग्रेस संबंधित लोकांना पदाधिकारी म्हणून संधी मिळाली आहे. यावरून भाजपच्या निष्ठावंतांनी, पदाधिकारी म्हणून नियुक्ती पाहिजे असल्यास DNA काँग्रेसचा असला पाहिजे, अशी बॅनरबाजी करण्यात आली. शेवगावमधील मंडलाध्यक्ष नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.

तसेच श्रीगोंदा मतदारसंघातील वाकळी चिंचोडी मधील मंडलाध्यक्षांच्या नियुक्तीला देखील वादात आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघात देखील एकतर्फा निवडीचा आरोप आहे. अकोले विधानसभा मतदारसंघात मंडलाध्यक्ष नियुक्तीवेळी वयाची अट पाळली गेली नाही, असा आरोप आहे. ही सर्व नाराजी या बैठकीत चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT