Chhagan Bhujbal Politics: लासलगाव बाजार समितीचे सभापतींची पहिल्याच बैठकीत कोंडी, ११ संचालकांचे हरकतीचे पत्र!

Chhagan Bhujbal; Lasalgaon Committee Chairman and D. Chairman reach Bhujbal's door for political solution-लासलगाव बाजार समितीच्या पहिल्याच बैठकीत सभापती उपसभापतींना राजकीय मतभेदाचा अपशकुन झाल्याने पदाधिकारी भुजबळांच्या दारी
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Lasalgaon APMC News: लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे. त्यामुळे या बाजारपेठेवर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रचंड राजकीय आटापिटा सुरू आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

विद्यमान अध्यक्ष डी के जगताप आणि उपाध्यक्ष ललित दरेकर हे सध्या अनेक राजकीय आव्हानांना सामोरे जात आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अध्यक्षपदी जगताप यांच्या नावाची सूचना केली होती. त्यामुळे भुजबळ यांच्या आदरापोटी सर्व संचालकांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीला मान्यता दिली होती.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांची पाठ फिरताच संचालकांत विसंवाद, ११ संचालकांची सभापतींच्या बैठकीला दांडी!

मात्र सहकारी संचालकांनी कान भरल्याने राजकीय तिकडम साध्य करण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्षांनी स्वतःच्या अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका सत्ताधारी गटाला बसला आहे. त्यांची पहिलीच बैठक गणपूर्ती अभावी स्थगित करावी लागली.

Chhagan Bhujbal
Ganesh Dhatrak Politics: गणेश धात्रक यांचा भाजप प्रवेश, शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना धक्का अन् एकनाथ शिंदेंना डोकेदुखी?

सहकार कायद्याच्या नियमानुसार तहकूब बैठक तीन दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी घेता येते. त्यासाठी गणपूर्तीची अट नसते. या तरतुदीचा लाभ घेऊन आज बाजार समितीच्या चेअरमन जगताप आणि व्हाईस चेअरमन दरेकर यांनी आपला अजेंडा रेटून नेण्याचा प्रयत्न केला.

मात्र प्रतिस्पर्धी संचालक जागरूक असल्याने त्यांनी तोही उधळून लावला आहे. बाजार समितीच्या पहिल्याच बैठकीला राजकीय मतभेदांचे ग्रहण लागले आहे. सध्या सत्ताधारी गटात चेअरमन जगताप, व्हाईस चेअरमन ललित दरेकर, जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे, छबुराव जाधव, प्रवीण कदम आणि सुवर्णा जगताप एवढे सात संचालक राहिले आहेत. ते अल्पमतात आहेत.

प्रतिस्पर्धी गट देखील तेवढ्यात जागरूक आहे. त्यांनी आजच्या तहकूब बैठकीला हजेरी लावली. माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, पंढरीनाथ थोरे, डि. के. आवारे, सोनिया होळकर, तानाजी आंधळे, गणेश डोमाडे, भाऊराज काळे, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, बाळासाहेब दराडे आणि रमेश पालवे असे अकरा संचालक यांनी वेगळी चूल मांडली आहे.

आजच्या मीटिंगमध्ये या सर्व ११ संचालकांनी विषय पत्रिकेतील प्रत्येक विषयावर आपली वेगळी मते लिखित स्वरूपात दिली आहेत. हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना राजकीय अल्टिमेटमच मानला जातो. या सर्व घडामोडी घडल्यानंतर अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्याकडे जाऊन मदतीची याचना केली.

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी याबाबत विरोधातील काही संचालकांची संपर्क केल्याचे कळते. एकमताने काम करावे अशी सूचना भुजबळ यांनी केली. विरोधातील संचालकांनीही आपला विरोध नाही मात्र पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. लासलगाव बाजार समितीत निवडणूक होताच पहिल्याच बैठकीत राजकीय मतभेदाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे आगामी काळात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची राजकीय कोंडी निश्चित मानली जाते.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com