Radhakrishna Vikhe Patil and Adv. Abhay Agarkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar BJP: भाजपची नगर शहर कार्यकारिणी जाहीर; विखे गटाला झुकते माप

Ganesh Thombare

Ahmednagar News: भारतीय जनता पक्षाच्या नगर शहर जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने जाहीर केली. यात दहा उपाध्यक्ष, आठ सरचिटणीस यांच्यासह मंडळ अध्यक्ष आणि आघाडी प्रमुखांसह 156 जणांचा समावेश आहे. नगर जिल्हा कार्यकारिणीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची छाप कमी आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला झुकते स्थान मिळाले आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर शहर जिल्हाध्यक्ष, दक्षिण आणि उत्तर जिल्हाध्यक्षकांची नियुक्ती जाहीर केल्यानंतर तीन महिन्यांपासून कार्यकारिणीची प्रतीक्षा होती. दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी कार्यकारिणी जाहीर केली होती.

त्यात चांगलीच धुसफूस समोर आली. आता शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी कार्यकारिणी जाहीर केली आहे. उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी अद्याप कार्यकारिणी जाहीर केलेली नाही.

अॅड. अभय आगरकर यांनी जुन्या आणि नव्याचा मेळ कार्यकारिणीत घालण्याचा प्रयत्न केला आहे. यात विखे गटाला झुकते माप मिळाले आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आले असले, तरी नव्यांना संधी देण्यावर भर देण्यात आला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. कायम निमंत्रित सदस्यांमध्ये 27 जणांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये केडगाव उपनगराला कमी संधी मिळाली आहे. मध्य नगर शहर आणि सावेडी उपनगराला झुकते माप मिळाले आहे.

कशी आहे जम्बो कार्यकारिणी ?

उपाध्यक्ष : नगरसेविका सोनाली चितळे, संध्या पवासे, अशोक गंगाधर गायकवाड, अनिल ढवण, अनंत देसाई, धनंजय जाधव, बाबा सानप, महेश झोडगे, प्रवीण ढोणे, तुषार पोटे.

सरचिटणीस : सचिन पारखी, अनिल मोहिते, प्रशांत मुथा, सविता कोटा, पंडित वाघमारे, महेश नामदे. युवा मोर्चा : मयूर बोचूघोळ.

महिला आघाडी : सुप्रिा जानवे, किसान आघाडी : राजेंद्र एकाडे, अनुसूचित जाती : नरेश चव्हाण, अनुसूचित जमाती : महेश शेळके, अल्पसंख्याक : अन्वर खान, ओबीसी आघाडी : बाळासाहेब भुजबळ. मंडल अध्यक्ष : नितीन शेलार (सावेडी), राहुल जामगांवकर (मध्यनगर), श्यामराव बोळे (भिंगार) व नीलेश सातपुते (केडगाव).

Edited by : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT