BJP MLA Seema hire With party workers
BJP MLA Seema hire With party workers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP; जिल्हाधिकारी दालनात भाजप नगरसेवकाचे अर्धनग्न आंदोलन

Sampat Devgire

नाशिक : अनेक निवेदने दिली मात्र केंद्रात, (Centre) राज्यात (Maharashtra) सत्ता असुनही प्रशासन दखल घेत नाही. शहरातील अंबड (Nashik) पोलिस ठाण्याचे (Police) विभाजन व्हावे यासाठी आज भाजपचे (BJP) माजी नगरसेवक राकेश दोंदे (Rakesh Donde) यांनी आंदोलन केले. हे आंदोलक जिल्हाधिकारी (Collector) कक्षात आल्यावर त्यांनी आपले शर्ट काढून टाकत अर्धनग्न होत आंदोलन केले. त्यामुळे हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले. राज्यातील सत्ता, गृह खाते असलेले भाजपला आंदोलनाची वेळ का येते हा प्रश्न देखील उपस्थित झाला. (BJP worker`s agitation for scission of Ambad Police station)

अंबड परिसरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गुन्हेगारी नियंत्रणात यावी यासाठी प्रदिर्घ काळ अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करण्याची मागणी आहे. या मागणीसाठी अंबड परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले.

भाजपचे आंदोलन असल्याने या पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. मात्र कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी नाशिक ते मुंबई अर्धनग्न पायी मोर्चाला काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आमदार हिरे यांनी मध्यस्थी करीत पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करण्यात येईल. पालकमंत्री भुसे काय निर्णय याची प्रतिक्षा करावी, असे सांगितले. त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. तेथील दालनात त्यांनी पुन्हा आपले शर्ट काढले. अर्धनग्न होऊन आंदोलन केले.

नाशिकमध्ये व उपनगरांत गुन्हेगारी वाढत आहे. अंबड परिसरातही यापूर्वी काही खुनाच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच एका वृद्धाच्या खुनाची घटना घडली होती. खून, दरोडे, प्राणघातक हल्ले, चोरी, चैन स्नॅचिंग अशा प्रकारच्या घटनांनी अंबड परिसरात उत आणला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे चित्र आहे.

अंबड परिसरातील नागरिकांनी यापूर्वी देखील स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी केली होती. मात्र आता थेट अंबड परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी नाशिक ते मुंबई असा अर्धनग्न मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्याआदीच त्यांची समजूत काढण्यात आली. आता ते सर्व पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT