Sujay Vikhe 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe : खैरे अन् दानवे का भांडतात? भाजपच्या सुजयदादांनी आणखी उडवून दिला भडका

BJP former MP Sujay Vikhe Shiv Sena Thackeray Ambadas Danve Chandrakant Khaire : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वादावर माजी खासदार सुजय विखे यांनी मोजक्या शब्दात केली टिप्पणी.

Pradeep Pendhare

Ambadas Danve vs Chandrakant Khaire : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला राज्यात चांगले दिवस येताना दिसत नाही. पक्षाला गळती लागली असतानाच, मराठवाड्यातील दोन नेत्यांमधील तीव्र संघर्ष टोकाला पोचलाय.

माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील हा संघर्ष आता मातोश्रीवर जाऊन पोचला आहे. तशी या दोघा नेत्यांमधील संघर्षाची ही पहिली वेळ नाही. मात्र, विरोधकांना यामुळे ठाकरे सेनेतील वाद भडकावून देण्याची संधी मिळते. भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी टायमिंग साधत या दोघांमधील भांडणात आणखी तेल ओतलं आहे. त्याचा भडका ठाकरे सेनेत नक्की उडणार असे दिसते.

सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी या दोघांना ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून कुठतरी जायचे असेल, म्हणून हे भांडण करत आहेत. नाराजी आता फॅशन झाली आहे आणि तक्रार करून काय उपयोग, 'मातोश्री'वर ऐकायला तरी कोण आहे, असा टोला लगावला आहे.

एवढ्या वर्षांत आत्तापर्यंत 'मातोश्री'ची, संजय राऊतांची (Sanjay Raut) कार्यपद्धती बदलली नाही. त्यामुळे 'मातोश्री'वर जाऊन काय होणार? त्यामुळे ज्यांना चांगल्या नेतृत्वाकडे जायचे असेल ते लोक मीडियाच्या माध्यमातून भांडण दाखवत आहे आणि बाहेर पडत आहे, असेही सुजय विखे यांनी म्हटले.

माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासूनचे हे वाद आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आता अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे हे उपस्थित न राहिल्याने पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे.

यावरून वादाला तोंड फुटले अन् चंद्रकांत खैरें यांनी अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला. मागून आला आणि काड्या करतो, इथं शिवसेना मी वाढवली, अशी तोफ खैरेंनी दानवेंवर डागली होती. यासंदर्भात मी पक्षप्रमुखांकडे तक्रार करणार असल्याचे म्हणत, खैरे यांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर चर्चा केली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून, वाद मिटल्याचे चंद्रकांत खैरे यांनी जाहीर केले. 15 जूनला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरला येणार असल्याचे सांगत, शिवसेना भवनचे उद्घाटन आणि शिबिरात सहभागी होतील. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमधील हंडा मोर्चात देखील सहभागी होतील, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT