Nashik Kumbh Mela Minister controversy : गिरीश महाजन सध्या कुंभमेळा मंत्री म्हणून कार्यरत आहेत. या मंत्रिपदावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या खात्याचा कारभार वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरला आहे.
गिरीश महाजन यांचे कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात यापूर्वीही त्यांनी हे मंत्रीपद सांभाळले आहे. मात्र आता त्यावर गंभीर राजकीय वाद उपस्थित झाला आहे.
काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुंभमेळा मंत्री हे पद नेमके कशासाठी आणि कोणत्या अधिकाऱ्याने निर्माण करण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला आहे. या पदाची घटनात्मक वैधता तपासण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कुंभमेळ्याशी संबंधित सहाशे कोटींच्या विविध कामांविषयी त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. नाशिक मध्ये वेगळेच आणि धक्कादायक कामकाज सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आपणच मुख्यमंत्री आहोत अशा अविर्भावात वावरत असल्याचे, चव्हाण म्हणाले.
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी रुपये उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येते. या निधीचे लेखापरीक्षण झाले आहे का?. त्याचा प्रकल्प अहवाल उपलब्ध झाला आहे का? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सध्या तरी कुंभमेळ्याचे कामकाज हा एक गंभीर विषय बनला आहे कामे मंजूर करायचे आणि ठेके द्यायचे असे सुरू आहे. यामध्ये ४० टक्के कमिशन घेण्याची प्रथा सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.