RSS Mohan Bhagwat : मोहन भागवतांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी USCIRFची RSSविरोधात मोठी मागणी; राजनैतिक सन्मान न देणे अन् उच्चस्तरीय बैठका टाळा, भारत-अमेरिका संबंधांत नवा वाद

USCIRF Calls for Action Against RSS Ahead of Mohan Bhagwat US Visit : धार्मिक अल्पसंख्याकांवरील कथित हल्ल्यांचा उल्लेख; संघाच्या पदाधिकाऱ्यांना राजनैतिक सन्मान देऊ नये आणि उच्चस्तरीय बैठका टाळाव्यात, अशीही आयोगाची मागणी
Mohan Bhagwat USA visit USCIRF
USCIRF RSSSarkarnama
Published on
Updated on

USCIRF RSS : अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (USCIRF) राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निर्बंध घालण्याची आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांना राजनैतिक सन्मान देऊ नये, अशी मागणी केल्याने भारतात नव्या राजकीय आणि कूटनीतिक चर्चेला तोंड फुटले आहे. आयोगाने संघाशी संबंधित काही गटांकडून धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले झाल्याचा आरोप केला आहे.

USCIRFचे अध्यक्ष आसिफ महमूद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही व्यापक संघटना असल्याचे नमूद करत, संघाशी संबंधित काही गटांनी मुस्लिम आणि ख्रिश्चनांसह धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य राहिले असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

सरसंघचालक (RSS) मोहन भागवत यांच्या प्रस्तावित अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर USCIRFच्या पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका मांडली आहे. भागवत 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग या संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Mohan Bhagwat USA visit USCIRF
Congress opposes BMC Project : 702 कोटींचा भार महापालिकेवरच का? काँग्रेस म्हणाली, 'BMC म्हणजे ATM नाही'

राजनैतिक सन्मान देऊ नये

USCIRFचे आयुक्त जीन मिल्स यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना अमेरिकेने राजनैतिक सन्मान देऊ नये, तसेच त्यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठका घेणे टाळावे, अशी मागणी केली आहे.

धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनासाठी जबाबदार ठरलेल्या व्यक्तींवर निर्बंध घालण्यावर अमेरिकी प्रशासनाने भर द्यावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मिल्स यांनी यासंदर्भातील मत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्यक्त केले आहे.

Mohan Bhagwat USA visit USCIRF
RSS Jaish Taliban Comparison : RSSला जैश-तालिबानच्या रांगेत बसवले; काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ

मार्चच्या अहवालातही गंभीर शिफारसी

USCIRFने मार्चमध्ये प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालातही भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीबाबत गंभीर आक्षेप नोंदवले होते. कथित धार्मिक स्वातंत्र्य उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) तसेच काही व्यक्ती आणि संस्थांवर निर्बंध घालण्याची शिफारस आयोगाने केली होती.

भारत सरकारने अहवाल फेटाळला

भारत सरकारने मात्र USCIRFचा अहवाल स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला होता. भारताचे ‘विकृत आणि निवडक चित्र’ मांडले जात असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला होता. त्यामुळे USCIRFची नवी भूमिका आणि त्यावर भारत सरकारकडून येणारी संभाव्य प्रतिक्रिया याकडे आता लक्ष लागले आहे.

मोहन भागवतांच्या दौऱ्यावर टीका

दरम्यान, ‘हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’ या संघटनेनेही मोहन भागवत यांच्या प्रस्तावित अमेरिका दौऱ्यावर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नेटवर्ककडून मुस्लिम आणि ख्रिश्चनांविरोधात हिंसाचार झाल्याचा आरोप करत, भागवत यांच्या दौऱ्याला या घटनांपासून वेगळे करून पाहता येणार नाही, असा दावा संघटनेने केला आहे. ‘एकतेचा उत्सव धार्मिक वर्चस्वाच्या राजकारणावर पडदा टाकू शकत नाही,’ असे संघटनेने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com