Adway Hirey & Dada Bhuse
Adway Hirey & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse; पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नियतीने सूड उगवला!

Sampat Devgire

मालेगाव : (Malegaon) नार-पार क्षेत्रात पाणीच नाही, कोणीच पाणी देवू शकत नाही, नार-पार योजनेला ‘आर पार’ म्हणत दादा भुसे (Dada Bhuse) यांनी या योजनेची खिल्ली उडवली होती. जनतेची दिशाभुल करुन २००४ मध्ये त्यांनी आमदारकी मिळवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी योजनेसाठी आठ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणे ही योजनेची खिल्ली उडविणाऱ्यांना सणसणीत चपराक आहे, असे आवाहन भाजपचे (BJP) अद्वय हिरे (Adway Hire) यांनी केले आहे. (Guardian Minister Dada Bhuse should apologise to people for Nar-par project)

यासंदर्भात श्री. हिरे म्हणाले, श्री. भुसे पालकमंत्री असतानाच योजनेसाठी निधी उपलब्ध होणे हा त्यांच्यावर नियतीने उगविलेला सूड आहे. त्यामुळे भुसे यांनी जनतेची फसवणुक केल्याबद्दल जाहीर माफी मागावी. श्री भुसे यांनी नार पार प्रकल्पाबाबत श्रेय न घेता या प्रश्नावर दिर्घराळ लढा देणाऱ्या नेत्यांनाच त्याचे श्रेय जाते हे लक्षात घ्यावे.

श्री. हिरे यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ही योजना नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रास वरदान ठरणारी आहे. माजीमंत्री प्रशांत हिरे यांनी स्वखर्चातून खासगी सर्व्हेक्षण करुन योजनेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा चालवली होती.

या योजनेची केंद्र, राज्य शासनास सर्वस्वी माहिती व्हावी म्हणुन मालेगांव येथे सर्वपक्षीय राष्ट्रीय, राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन वेळा पाणी परिषद घेतली. संबंधीत खात्यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना योजनेचे महत्व पटवून देण्यात व ४० टीएमसी पाणी मिळवण्यात ते यशस्वी होत असतानाच विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान श्री. भुसे यांनी नार-पारची खिल्ली उडवत आर पार म्हणुन हेटाळणी करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला होता.

आता जनतेलाही दूध का दूध आणि पाणी का पाणी समजले आहे. यामुळे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या भुसे यांनी जाहिर माफी मागावी. १० टीएमसीऐवजी पूर्ण ४० टीएमसी पाणी गिरणा खोऱ्यात टाकुन आत्मपरिक्षण करावे, असेही पत्रकात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT