Girish Mahajan On Sanjay Raut : मुंबईत निघाालेला हिंदू जनआक्रोश मोर्चा हा भाजपाचा मोर्चा होता. तो हिंदू जनआक्रोश वगैरे काही नव्हता. कालचा मोर्चा कुणी आणि कुणाविरोधात काढला हे स्पष्टच झालं नाही. मला तर असं वाटतंय की, भाजपाच्या महाराष्ट्र युनिटनं मोदींविरोधात हा आक्रोश मोर्चा काढला की काय? असा लोकांचा गैरसमज आहे. असा हिंदू जनआक्रोश मोर्चा महाराष्ट्रात निघाला असेल, तर ते आव्हान थेट मोदी, शाहांना आहे.
कारण नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सगळे स्वत:ला कडवट हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे नेते आहे असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला होता. त्याला भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. महाजन म्हणाले, संजय राऊतांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. त्यांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूसारखाच हिंदुत्वविरोधी बिंदू आला आहे. राहुल गांधींबरोबर ते काश्मीरमध्ये फिरत असून त्यांना आणि आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेनं हिंदूत्वापासून देखील फारकत घेतली आहे. आता त्यांना हिंदू शब्दाचीसुद्धा अॅलर्जी होत आहे. या नैराश्यातून संजय राऊतांनी असं वक्तव्य केलं आहे अशी टीका गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी यावेळी केली आहे.
संजय राऊत वैफल्यग्रस्त...
संजय राऊत हे हिंदूत्वाबरोबर फारकत घेऊन गळ्यात गळे घालून कोणसोबत फिरतायत हे सर्वांना दिसत आहे. वेळप्रसंगी ते एमआयएमबरोबर सुद्धा जाऊन बसले आहेत. त्यांच्याकडे आमदार, खासदार आणि शिवसैनिकही राहिले नाहीत. ते सगळे एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले असून नैराश्यातून पाहिजे ते बोलत आहेत असा हल्लाबोलही महाजनांनी राऊतांवर केला आहे.
..त्यावेळी भाजपने मोर्चे काढले नाहीत? राऊतांचा सवाल
मुंबईत हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावरुन ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला होता. केंद्रात आठ वर्षांपासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह हे दोन्ही प्रबळ आणि शक्तीमान नेते आहेत. तरीही ‘धर्मांतरण’आणि ‘लव्ह जिहाद’सारखे विषय घडत असतील, तर हे त्या सरकारचं अपयश असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर भाजपाने मोर्चे काढले नाहीत? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.