Girish Mahajan, BJP
Girish Mahajan, BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan On Budget : अर्थसंकल्पावर विरोधकांची टीका तर सत्ताधाऱ्यांकडून कौतुक; मंत्री महाजन काय म्हणाले?

सरकारनामा ब्यूरो

Union Budget 2023 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, आता या अर्थसंकल्पावरुन वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. तसेच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी देखील अर्थसंकल्पावरुन उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. सत्ताधारी पक्षाकडून अर्थसंकल्पाचं कौतुक तर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. आता याचवेळी भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना अर्थसंकल्पावर भाष्य केले. महाजन म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या सबका साथ, सबका विकास आणि आत्मनिर्भर भारत या दोन संकल्पावरच आज देशाच्या प्रगतीचा आलेख मांडण्यात आलेला आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा संतुलित प्रयत्न करण्यात आलेला आहे.

देशाचा कणा असणाऱ्या कृषी क्षेत्रासाठी यंदा देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्राधान्य देण्याचे धोरण ठरविले असून यासाठी पीएम प्रमाण योजना उपयुक्त ठरणार आहे असेही गिरीश महाजन(Girish Mahajan) म्हणाले.

तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मही प्रगतीसाठी मदत करणार आहे. रेल्वेसाठी यंदा विक्रमी २ लाख ४० हजार कोटींची केलेली तरतूदही स्तुत्य आहे. तर देशात तब्बल १५७ नर्सींग कॉलेजचा शुभारंभ हा आरोग्य सेवेला बळकटी प्रदान करेल. गोरगरिबांना वर्षभर मोफत धान्याच्या योजनेला मिळाली मुदतवाढ ही सामाजिक न्यायासाठी उत्तम आहे. ग्रामविकासासाठी देखील यंदा भरीव तरतूद केलेली आहे असेही मत महाजन यांनी यावेळी व्यक्त केले.

अर्थमंत्र्यांनी सर्वसमावेशक वाढ, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित वाढ, युवा शक्ती, वित्तीय क्षेत्र या सात मुद्यांवरून अर्थसंकल्प मांडला असून यामुळे देशाची खऱ्या अर्थाने चौफेर प्रगती होणार आहे. तर यंदा आयकर खात्याच्या स्लॅबमध्ये बहुप्रतिक्षित बदल करण्यात आल्यामुळे मध्यमवर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण, रेल्वे, आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार असून महिलांसाठी देखील अनेकविध कल्याणकारी योजना जाहीर झाल्या आहेत. या सर्व बाबी प्रगतीला पूरक असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT