Teacher-Graduate Eletion Results : उद्या शिक्षक-पदवीधर निवडणुकांमध्ये कुणाचा 'निकाल' लागणार?

Teacher-Graduate Eletion : उद्या दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Teacher-Graduate Eletion :
Teacher-Graduate Eletion :Sarkarnama

Teacher-Graduate Eletion : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुकांसाठी नुकतेच मतदान पार पडले. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले. आता उद्या या निवडणुकांचा निकाल येणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने आपणच विजयी होणार असा दावा केला असला तरी, उद्या दुपारपर्यंत याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नाशिक पदवीधरमध्ये बऱ्याच राजकीय नाट्यानंतर सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर आधी भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्या शुभांगी पाटील या ठाकरे गटाच्या गोटास जाऊन मिळाल्या. यामुळे येथील वेगवेगळ्या राजकीय नाट्यानंतर निकाल काय येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाले आहे. तांबे ताकदवान उमेदवार असले तरी शुभांगी पाटील त्यांना तुल्यबल लढत देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Teacher-Graduate Eletion :
शिक्षक मतदारसंघ निवडणूक : शिक्षक भारतीने नाना पटोलेंना करून दिली ‘ती’ आठवण !

अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लिंगाडे यांनी एका रात्रीतच ठाकरे गटातून कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला होता. ते ठाकरे गटाचे बुलडाण्याचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीनेही (Mahavikas Aghadi) लिंगाडे यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. तर दुसरीकडे भाजपसाठी आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने पुन्हा डॉ. रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. गेल्‍या निवडणुकीच्‍या वेळी डॉ. रणजित पाटील हे राज्‍यमंत्री होते. मात्र सद्या ते मंत्रिपद नाहीत. पक्षसंघटनेचाच त्यांना आधार आहे.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विक्रम वसंतराव काळे तर भाजपकडून किरण नारायणराव पाटील हे आमने सामने आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून कालीदाल शामराव माने रिंगणात आहेत. विक्रम काळे हे विजयाचे दावेदार मानले जात आहेत. मात्र स्थानिक राजकारणाच्या उलथापालथीनंतर कोणतेही पूर्वालोकन करणे, घाईचे ठरणारे आहे.

Teacher-Graduate Eletion :
Bjp News : प्रचार शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा, प्रसार पंकजांच्या नाराजीचा..

भाजपने समर्थन दिलेले शिक्षक परिषदेचे शिक्षक उमेदवार नागो गाणार (Nago Ganar) हे नागपूर शिक्षक मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विदर्भ माध्यमिक संघाचे सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्या प्रमुख लढत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र होते. मात्र आता निकालात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

Teacher-Graduate Eletion :
Shikshak-Padavidhar Election : शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

कोकण शिक्षक मतदारसंघात मविआ आणि भाजप अशी थेट लढत आहे. मविआचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांच्या विरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढवत आहेत. भाजपने ऐनवेळी उमेदवार आयात केल्याने या निवडणुकीची रंगच अधिकच वाढलेली आहे.

Teacher-Graduate Eletion :
Amravati Graduate Constituency Election : कॉंग्रेसकडून अमरावती पदवीधर मतदार संघतून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर

या सर्व मतदारसंघाचे निकाल उद्या लागणार आहेत. मागील पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार बाजी जिंकली होती, तर यंदा राजकीय समीकरण बदललेले असताना, निकाल काय लागणार? या निकालात पाचपैकी किती जागा कोण राखणार? कोणाच्या वाट्याला काय येणार याची उत्सुकता लागली आहे. उद्या दुपारपर्यंत याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com