Maharashtra politics : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुणे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना कॉंग्रेसला फोडा, कॉंग्रेस रिकामी करा असा कानमंत्र दिला. याबाबत एक ऑडिओही व्हायरल झाली. त्यानंतर कॉंग्रेस नेते जणू बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत. बावनकुळेंवर कॉंग्रेसच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.
काँग्रेसला खाली करणे बावनकुळेंना मकाऊमधल्या कॅसिनोत गेम खेळण्या सारखं वाटतं का? एका रात्रीत काँग्रेस खाली होईल? असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. अशी टीका कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. तसेच आज तुमचे दिवस आहेत. पण उद्या आमचेही दिवस येतील. 'हम भी चुन चुन कर बदला लेंगे' असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनीही बावनकुळेंच्या विधानावरुन भाजपला इशारा दिला.
दरम्यान आज यांसदर्भात बोलताना बावनकुळे यांनी पुन्हा थोडे घुमजाव केलं. बावनकुळे म्हणाले, "काँग्रेसमधील खालच्या स्तरावरील कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाकडे विकासाचे कोणतेही स्पष्ट व्हिजन नाही. ना देशासाठी भूमिका आहे, ना राज्यासाठी. केवळ ईव्हीएमला दोष देऊन पक्ष चालत नाही. विकासासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते. विकासाच्या यात्रेत कोणी सहभागी होऊ पाहत असेल, तर काय वाईट आहे. त्या अर्थाने मी असे म्हणालो होतो. निष्ठावंतांची संमती घेऊनच पक्षप्रवेश दिला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
बावनकुळे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्यासाठी अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. देशात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच हे प्रवेश होत आहे. भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांची संमती घेऊनच नव्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जातो आहे.
यातून बावनकुळे यांना कॉंग्रेस पक्षही फोडायचा आहे. त्यांच्या पक्षातील कार्यकर्तेही आपल्या पक्षात घ्यायचे आहेत. मात्र त्याचवेळी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेऊन नाराज होऊ द्यायचे नाही. यामुळे बावनकुळे यांच्या या नव्या स्ट्रॅटेजीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला जणू उत आला आहे. जो तो आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना गळाला लावत आहे. मात्र या सर्वांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मरण होत असल्याचे चित्र आहे. त्यातूनच बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिल्याचं दिसतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.