BJP News : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. आता राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून सातत्याने प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांवर जाळे टाकले जात होते. सर्वाधिक पक्षांतर याच पक्षात झाले होते. आता मात्र महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे आहेत.
एकनाथ शिंदे पक्षाचा एक मोठा पदाधिकारी लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार आहे. त्याचवेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराचे प्रमुख देखील त्याच मार्गावर आहेत. उद्धव ठाकरे पक्षाचे हे पदाधिकारी यापूर्वीच जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत होते. मात्र समन्वय नसल्याने तो प्रवेश टळला होता.
भारतीय जनता पक्ष महापालिकेत स्वबळावर सत्तेत होता. पक्षाचे 65 नगरसेवक होते. त्या खालोखाल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 35 नगरसेवक होते. आगामी महापालिका निवडणुकीत खरी लढत या दोन पक्षांतच अपेक्षित होती. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष निम्म्याहून अधिक रिकामा केला आहे.
महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र निवडणुकांना सामोरे गेल्यास त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची सर्वाधिक कोंडी होण्याची शक्यता आहे. पार्श्वभूमीवर या पक्षाने शिवसेना ठाकरे पक्षासह एकूण 22 नगरसेवकांना फोडले होते. आता या नगरसेवकांना उमेदवारी मिळणार का? असा राजकीय पेच निर्माण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. या सत्तेच्या माध्यमातून शिवसेना एकनाथ शिंदे आणि विरोधकांना कमकुवत करण्यासाठी भाजप जोरदार तयारीत आहे. त्याचा फटका दोन्ही शिवसेना कितपत सहन करते याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.