Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांची बडगुजर प्रकरणावरून भाजप नेत्यांना थेट तंबी, म्हणाले, गप्प रहा!

Girish Mahajan Gave Direct Warning to Complainants: मंत्री गिरीश महाजन यांचा तक्रार करणाऱ्या नेत्यांना शांत राहण्याचा सुचक सल्ला.

Sampat Devgire

Girish Mahajan News: नाशिक शहरात शिवसेनेचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर आणि भाजप आमदाराविरोधात बंडखोरी केलेल्या गणेश गीते यांच्या भाजप प्रवेशावरून रोज नव्या घडामोडी होत आहेत. या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांनी विरोध करणाऱ्यांना थेट इशारच दिला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी प्रखर विरोध केला आहे. पक्षात बंडखोरी करून विधानसभा निवडणूक लढविलेल्या गणेश गीते यांच्या प्रवेशाला आमदार राहुल ढिकले यांचा विरोध आहे. बाबत पक्षाच्या विविध माजी नगरसेवकांनी या प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपच्या उद्धव निमसे, संभाजी मोरुस्कर, अरुण पवार आणि दिनकर आढाव यांसह विविध नेत्यांनी काल मुंबईत गिरीश महाजन यांची भेट घेतली. गणेश गीते यांना पक्षात प्रवेश देऊ नये. नागरिकांमध्ये याबाबत भाजप विषयी रोष निर्माण झाला आहे, असे या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले.

त्याला प्रतिसाद देण्याऐवजी भाजपच्या संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी या पदाधिकाऱ्यांनाच आपल्या स्टाईलने समज दिली. या प्रकरणात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिस्त पाळावी. पक्षात कोणाला घेऊ नये यावर मतप्रदर्शन करू नये. सत्ता महत्त्वाची आहे. त्यासाठी एक एक नगरसेवक महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे पदाधिकारी पक्षात येणाऱ्यांना जाहीरपणे विरोध करून पक्षाची प्रतिमा मलीन करीत आहेत. याबाबत माध्यमान बातम्या येत असल्याने पक्षावर शिंतोडे उडतात. याची जाणीव भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. नव्या पदाधिकाऱ्यांना घेतल्याने पक्षातील शिस्त बिघडणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत.

यापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिडको परिसरातील १४ माजी नगरसेवकांसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांना पक्षात प्रवेश देऊ नये. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत आणि मतदारांमध्ये वेगळा संदेश जाईल, असा इशारा दिला होता.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांना प्रवेश दिला जाणार नाही या आनंदात भाजप पदाधिकारी होते. मात्र या सर्व घडामोडींपासून लांब असलेल्या गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आपले महत्त्व आणि भूमिका पदाधिकाऱ्यांना जाणीव होईल अशा पद्धतीने व्यक्त केली आहे. त्यामुळे महाजन यांच्या भेटीनंतर मुंबईला गेलेले बहुतांशी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक स्विच ऑफ मोडमध्ये गेले आहेत.

या निमित्ताने सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांचा प्रवेश होणार असा संकेत मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले, देशद्रोही म्हटले अशा नेत्यांनाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन रेड कार्पेट अंथरणार आहेत. मतदार कोणत्याही परिस्थितीत भाजप बरोबरच आहेत असे गृहीत धरून या राजकीय हालचाली सुरू आहेत. त्याने भाजपचे आमदारही आता जाहीरपणे बोलण्याचे टाळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT