Girish Mahajan
Girish Mahajan Sarkaranama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan news: गिरीश महाजनांनी वाढवली भाजप आमदारांची धडधड!

Sampat Devgire

Mahayuti Politics News : नाशिक जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीत सरासरीपेक्षा अधिक मतदान झाले आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिलेल्या दिंडोरी मतदारसंघात (Dindori Constituency) मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता देखील वाढली.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (Shiv Sena) महायुतीने यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली होती. त्यामुळे उमेदवारी निश्चित करण्यापासून तर प्रचाराच्या नियोजनातही काळजीपूर्वक काम केले होते. असे असतानाही भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यातच मतदानाचे प्रमाण घटल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते सावध झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संकट मोचक ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे निवडणूक कालावधीत नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून होते. गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या अहवालानुसार जिथे जिथे अडचणी होत्या, तिथे त्यांनी विशेष उपाययोजना केल्या. या संदर्भात महायुतीच्या सर्व उमेदवारांची आणि आमदारांची नियमित संपर्क ठेवण्यात येत होता. वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या होत्या. तरीही एकंदर मतदान प्रक्रियेदरम्यान महायुतीत (Mahayuti) चिंतेची स्थिती असल्याचे पुढे आले आहे.

यासंदर्भात काही भले बुरे होऊ नये आणि तसे झाल्यास काय उपाययोजना करावी यामध्ये सर्व नेते व्यस्त झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या दिंडोरी मतदारसंघातील केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांची निवडणूक पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघात देखील अशीच स्थिती आढळून आली. आहे त्यामुळे मतदान संपल्यानंतर आता बूथनिहाय मतदानाची आकडेवारी मागविण्यात आली आहे. या आकडेवारीचा अभ्यास पक्षाच्या एजन्सी कडून केला जाणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

नाशिक लोकसभा (Nashik Loksabha Politics) मतदारसंघात इगतपुरी येथील काँग्रेसचे हिरामण खोसकर वगळता उर्वरित सर्व आमदार महायुतीचे आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व आमदार महायुतीचे आहेत. यामध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राज्य मंत्रिमंडळात सदस्य आहेत. स्वतः उमेदवार भारती पवार देखील राज्यमंत्री आहेत. असे असतानाही मतदानाच्या प्रमाण आणि संकेत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या भागात कमी मतदान झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची गंभीर दखल घेतल्याचे बोलले जाते.

यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे प्रतिमा आणि अयोध्येतील श्रीराम मंदिर हे महायुतीचे मुख्य मुद्दे होते. ते प्रचारात दुर्लक्षित झाल्याचे आढळून आले आहे. मंत्री महाजन यांच्याकडे नगर जिल्हा वगळता उत्तर महाराष्ट्रातील सहा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यात महाजन यांनी आमदारांवर विशेष जबाबदाऱ्या टाकल्या होत्या. त्यांना अपेक्षेपेक्षा एक रसद पुरविण्यात आली होती. त्यानंतरही पक्षाला अपेक्षित निकाल मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. आता महाजन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महायुतीच्या आमदारांची धडधड वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT