Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होईल. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय धुरळा जोर धरू लागला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय द्वंद देखील तसं टोकाला पोचलं आहे.
दोघंही दिग्गज एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अहिल्यानगरमधील विकासाच्या प्रक्रियेची जलेसी शेजारच्यांना पाहवत नाही, असा टोला बाळासाहेब थोरातांना लगावला आहे.
भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते राहाता तालुक्यातील विविध विकास कामांच्या प्रारंभ झाला. त्यावेळी मंत्री विखेंनी काँग्रेस (Congress) नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. मंत्री विखे अहिल्यानगर जिल्ह्यातील विकास प्रक्रियेत शेजारच्यांना पाहावत नाही. त्यांना देखील मंत्रिपदावर संधी मिळाली होती. परंतु त्यांना निर्णय घेता आलेले नाही. आताचे विकास प्रकल्प पाहून त्यांना जेलसी होवू लागली आहे, असा टोला थोरातांना लगावला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विकास प्रकल्पांची गती कायम ठेवायची असेल, सर्वसामान्यांचे प्रपंच उद्धवस्त होवू द्यायचे नसेल, तर त्यांनी बोलघेवड्या पुढाऱ्यांपासून सावध असलं पाहिजे, असेही राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी म्हटलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून सर्वसामान्य महिलांना मदत देण्याचे काम महायुती सरकारनं केले. परंतु या योजनेला महाविकास आघाडीकडून बदनाम केले जात आहे. ही योजना बंद पाडू म्हणणाऱ्यांना दारात देखील उभं करू नका. महायुतीची सत्ता पुन्हा सत्तेत आल्यावर या अनुदानात वाढ करणार असल्याची ग्वाही राधाकृष्ण विखेंनी दिली.
निळवंडे कालव्यावरून सातत्यानं आपली बदनामी करण्यात आली. परंतु हे काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. तो आपण 2024 मध्ये पूर्ण केला. समन्यायी पाणी वाटपाचं भूत शेजारच्यांनीच आपल्या मानगुटीवर आणून बसवलं. जायकवाडी भरल्याचं समाधान आहे. परंतु अहिल्यानगर जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम नद्यांचं पाणी पूर्वेकडे वळवण्यावर महायुती सरकारनं काम सुरू केले असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.