Nilesh Lanke Vs Radhakrishna Vikhe : मंत्री विखेंच्या सुडाच्या राजकारणावर खासदार लंकेंचा निशाणा; म्हणाले, 'सुंभ जळाला...'

MP Nilesh Lanke criticized Minister Radhakrishna Vikhe revenge politics : पारनेरमधील विकासकामांना सूड भावनेतून रोखत असल्याचा खासदार नीलेश लंके यांचा मंत्री राधाकृष्ण विखेंवर आरोप.
Nilesh Lanke
Nilesh Lanke Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सुडाच्या राजकारणावर जोरदार निशाणा साधला आहे.

"'सुंभ जळाला, तरी पीळ काही जात नाही', असा टोला लगावत आम्ही संघर्षासाठी तयार आहोत", असा इशारा खासदार लंके यांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. राज्याच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार नीलेश लंके यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाचा होऊ लागला आहे. खासदार लंके यांनी मंत्री विखे यांच्या सुडाच्या राजकारणावर टीका केली आहे.

Nilesh Lanke
Balasaheb Thorat : 'अध्यादेशाच असं झालंय की, आला की, कर पास'; थोरात म्हणाले, 'मुख्यमंत्री वाचतच...'

खासदार लंके म्हणाले, "काही खोडील लोकांनी विकास कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. सूड भावनेतून पारनेर शहराची पाणीपुरवठा योजना अडवली. मंजूर रस्त्यांची कामे अडवण्याचा प्रयत्न चालवलाय. ही कामे माझे वैयक्तिक नाहीत. यात काही स्वार्थ देखील नाही. आपल्यात राजकीय वाद असतील, तर ते आपण पाहू. पण जनतेला वेठीस धरण्यात काय अर्थ आहे?" सुंभ जळाला, तरी पीळ काही जात नाही, असाही टोला खासदार लंकेंनी (Nilesh Lanke) मंत्री विखेंना लगावला.

Nilesh Lanke
Shivaji Kardile : शिवाजी कर्डिलेंनी खेळला भावनिक पत्ता; म्हणाले, 'कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव वाढत्या वयात...'

पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा ते खडकी (ता. नगर ) या 48 किलोमीटर लांबीच्या आणि 363 कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपुजन ऑनलाईनपद्धतीने राज्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते झाले. तर पारनेर शहरात खासदार लंके यांनी या रस्त्याचे प्रत्यक्षात भमिपूजन केले. त्यावेळी त्यांनी मंत्री विखेंवर निशाणा साधला. अ‍ॅड. राहुल झावरे, नगराध्यक्ष नितीन अडसूळ, रा. या. औटी, संदीप चौधरी, योगेश मते, संजय लाकुडझोडे, डॉ.बाळासाहेब कावरे, महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

खासदार लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपली सावड आहे. ते अडचणीत असताना आपण त्यांच्याबरोबर राहिलो. त्यामुळे त्यांनी आपण मागणी केल्यावर देवीभोयरे ते खडकी या 48 किलोमीटर रस्त्याच्या कामाला तातडीने मंजुरी दिली. पारनेरच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळावी, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनदा भेट घेतली. पारनेरचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक त्याचे साक्षीदार आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या योजनेला मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

पारनेर कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे

पारनेर शहराच्या विकासासाठी 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र लोकसभा निवडणुकीत पारनेरमध्ये मी 750 मतांनी पिछाडीवर असल्याचे सांगत खासदार लंके यांनी पारनेर शहरातील कार्यकर्त्यांना टोला लगावला. पारनेरच्या कार्यकर्त्यांनी आता आत्मपरीक्षण केले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत पारनेरकरांना चुका सुधारण्याची संधी असल्याचेही खासदार लंके म्हणाले.

ज्याच्याकडे बुंदी तो स्वतःला घेणारच ना!

महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार सर्वांना माहिती आहे. ज्याच्या हातात बुंदी तो स्वतःला वाढून घेणार ना! असे सांगत महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी इतरांनी वेळ घालू नये. निवडणुका आल्यावर पावसाळ्यात भूछत्र उगवते, त्याप्रमाणे काही लोक बैठका घेऊ लागल्याचे सांगत पारनेर-नगर मतदार संघाची उमेदवारी राणी लंके यांनाच असल्याचे खासदार लंके यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com