Nashik Politics : खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक संशयित उद्धव निमसे यांनी तुरुंगातूनच महापालिकेच्या नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे समजते. जिल्हा न्यायालयाने त्यांना तशी परवानगी ‘ग्रान्ट’केल्याची माहिती अॅड. मनोज पिंगळे यांनी दिली. तसेच निमसे कुटुंबातून त्यांची पत्नी किंवा मुलीलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात.
निमसे हे अद्याप तुरुंगात असून त्यांच्या जामिनावरील सुनावणी आता २९ डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान निमसे यांच्या जामिनास धोत्रे गटासह त्यांच्या वकिलांनी विरोध केला आहे. अशा परिस्थितीतीत निमसे व त्यांचे समर्थक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
22 ऑगस्ट रोजी नाशिकच्या नांदूर नाका परिसरात दुचाकीचे चाक पायावर गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे यांच्या गटात वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यात राहुल धोत्रे गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान नंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल 20 दिवस उद्धव निमसे फरार होते. पोलिसांचे पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली होती. त्यानंतर ते स्वत:हुन पोलिसांना शरण आले होते व पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
राहुल धोत्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेले उद्धव निमसे सध्या जामिनासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यांनी ७ नोव्हेंबरला जामिनाचा अर्ज दाखल केला असून १४ नोव्हेंबरपासून त्या अर्जावर नियमित सुनावणी होत आहे. मंगळवारी (२३ नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीदरम्यान युक्तिवाद सुरु असताना धोत्रे गटाने थेट न्यायाधीशांवरच हरकती घेतल्या. हे प्रकरण प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे धाडण्यात आल्यानंतर बुधवारी (२४ नोव्हेंबर) पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली.
दरम्यान या प्रकरणातील पुढील निर्णयासाठी संबंधित न्यायालयाने प्रधान मुख्य न्यायाधीशांचे मार्गदर्शन मागितले. त्यानुसार, कारागृहात असलेल्या निमसे यांना महापालिका निवडणुकीतून उमेदवारी दाखल करण्यास मंजुरी द्यावी का, याबाबतची सुनावणी शुक्रवारी (२६ तारखेला) झाली. यावेळी न्यायालयाने निमसे यांना कारागृहातूनच निवडणूक रिंगणात उतरण्याची अनुमती दिल्याचे अॅड. मनोज पिंगळे यांनी माहिती दिली.
दरम्यान भाजपचे आणखी एक माजी नगरसेवक जगदीश पाटील हे गोळीबार प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयातून कारागृहात आहेत. पाटील यांच्या जामीन अर्जावरही शुक्रवारी (दि. २६) निर्णय होणार होता. मात्र, न्यायालयाने या अर्जावर २९ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे पाटील यांच्याबाबत न्यायालय काय निकाल देतं याकडेही लक्ष्य लागून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.