Eknath Shinde Politics : वरणगावच्या अपक्ष निवडून आलेल्या नगराध्यक्षांना शिंदेंची 'ऑफर', आमच्यासोबत या.. निधी कमी पडू देणार नाही!

Sunil Kale Varangaon : सुनील काळेंना उमेदवार न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीआधी मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतरही काळेंना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली.
Eknath Shinde Politics : वरणगावच्या अपक्ष निवडून आलेल्या नगराध्यक्षांना शिंदेंची 'ऑफर', आमच्यासोबत या.. निधी कमी पडू देणार नाही!
Published on
Updated on

Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव नगरपालिकाचे नवनिर्वाचित अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष झालेले काळे काय निर्णय घेतात याकडे वरणगावकरांचे लक्ष लागले आहे.

नगरपालिका निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत सुनील काळे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढून विजय मिळवला. भाजपचे अधिकृत उमेदवार श्यामल अतुल झांबरे यांचा त्यांनी पराभव केला. चुरशीच्या झालेल्या लढतीत ७८२ मतांनी अपक्ष उमेदवार सुनील काळे निवडून आले व नगराध्यक्ष झाले.

विशेष म्हणजे भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मंत्री संजय सावकारे व मंत्री रक्षा खडसेंनी ही लढाई प्रतिष्ठेची केली होती. पण या दोन्ही मंत्र्यांची पॉवर फेल गेली. अपक्ष उमेदवार सुनील काळे त्यांच्यावर भारी पडले.

त्यानंतर काळेंना आता थेट शिवसेनेसोबत येण्याची ‘ऑफर’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आमच्यासोबत या.. शहराच्या विकासासाठी भरघोस निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही शिंदेंनी काळे यांना दिली आहे. तुम्ही अपक्ष निवडून आला आहात.. नगरविकास खाते माझ्याकडे आहे, आपल्याला शहरात गटार, रस्ते, उद्याने अशी खूप विकासकामे करायची आहेत. निधीची कमतरता पडू देणार नाही. अशी ऑफर एकनाथ शिंदे यांनी काळेंना दिली आहे. त्यावर . एकदा गिरीशभाऊंशी बोलून घेतो असे काळे यांनी शिंदे यांना कळवले आहे.

त्यामुळे भाजपत बंडखोरी करुन आलेले सुनिल काळे मंत्री गिरीश महाजन यांचे ऐकुन भाजपसोबत जाणार की एकनाथ शिंदें यांची ऑफर बघून त्यांच्याकडे जाणार याकडे वरणगाववासियांचे लक्ष लागून आहे.

कोण आहेत सुनिल काळे ?

सुनील काळे हे मुळचे भाजपचे कार्यकर्ते आहेत. युवा मोर्चापासून त्यांनी पक्षाचे काम केले आहे. सुरवातीच्या काळात ते एकनाथ खडसेंचे कट्टर समर्थक होते. मात्र, उमेदवारीच्या नाराजीतूनच ते खडसेंपासून दुरावले व गिरीश महाजनांचे निकटवर्तीय बनले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसेंना रावेर मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर काळेंनीच त्यांच्याविरोधात भर बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. तो वाद माध्यमांमधूनही गाजला होता.

आता नगराध्यक्षपदी अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सुनील काळे जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काळेंचा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद घडवून आणला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com