नाशिक : महाराष्ट्रातील (Maharashtra) नावाजलेल्या नाशिक (Nashik) कृषी उत्पन्न बाजार समितीवर (APMC) अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्तीसाठी भाजप (BJP) नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार देवीदास पिंगळे (Devidas Pingle) यांना शह देण्याचा प्रयत्न होता. मात्र याबाबत थेट न्यायालयानेच प्रशासक नियुक्तीची सुचना केल्याने भाजप नेत्यांच्या आकांक्षांवर पाणी फिरल्याचे बोलले जाते. (NCP leader Devidas Pingle success to fail BJP leaders plan)
सद्यस्थितीत या समितीवर प्रशासक नियुक्त केलेला आहे. मात्र, या बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीसाठी काही भाजप नेत्यांचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी मुंबईत इच्छुकांनी फिल्डींग देखील लावली होती. परंतु न्यायालयाने प्रशासक नियुक्त देण्याचे आदेश दिल्याने इच्छुकांचा बाजार समितीवर बसण्याचा डाव उधळला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यातील कृषी बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत असलेले संभ्रम दूर झाला असून बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग खुला झाला आहे. येत्या 30 एप्रिल 2023 पूर्वी बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले असून, तोपर्यंत अशासकीय प्रशासकांची नियुक्ती बाजार समित्यांवर करण्याचे निर्देश दिले आहे. नाशिक जिल्हयातील बहुतांश बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त आहे. मात्र, पिंपळगाव आणि लासलगाव बाजार समित्यावर संचालक मंडळ कार्यरत असल्याने यावर प्रशासक नेमावा की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी राज्य शासनाच्या आदेशाची प्रतिक्षा लागली असून हे आदेश पुढील आठवडयात प्राप्त होण्याची शक्यता आहे.
जिल्हयातील लासलगाव, पिंपळगाव, येवला, चांदवड व कळवण यांसह 40 बाजार समित्यांनी याशिवाय राज्यभरातून विविध बाजार समित्यांनी दाखल केलेल्या याचिका समवेत राज्य शासनाच्यावतीने देखील नागपूर खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्रक यावर गत आठवडयात दोन दिवस सुनावणी झाली. यात नागपूर खंडपीठाने कोणत्याही परिस्थितीत 30 एप्रिल 2023 पूर्वी राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यात याव्यात असे आदेश दिले आहेत. याशिवाय ज्या बाजार समित्यांवर संचालक मंडळ कार्यरत आहे तेथे तात्काल प्रशासकीय मंडळ नियुक्त न करता शासकीय प्रशासकाची नियुक्ती करावी. त्यासाठी राज्य शासनाचे योग्य ते मार्गदर्शन घ्यावे असे आदेश काढले आहेत.
जिल्हयातील 14 बाजार समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून त्यांना निवडणुकांची प्रतिक्षा आहे. त्यामुळे यातील लासलगाव व पिंपळगाव बाजार समिती वगळता सर्वच बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती झालेली आहे. पिंपळगाव व लासलगाव बाजार समित्यांच्या संचालक मंडळास न्यायालयानेच मुदत वाढ दिलेली आहे. त्यामुळे या बाजार समित्यांवर आता प्रशासक यांची नियुक्ती बाबत संभ्रम तयार झाला आहे. संबंधित बाजार समित्यावर प्रशासक नियुक्त करण्यासाठी राज्य शासनाचे आदेश लागणार आहे. सदर आदेश अद्याप प्राप्त झालेले नाही. पुढील आठवडयात शासनाकडून हे आदेश प्राप्त होतील असे बोलले जात आहे. हे आदेश मिळाल्यानंतरच पिंपळगाव आणि लासलगाव बाजार समित्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.