Sanjay Raut; तर मुख्यमंत्र्यांनी दारावर लाथ मारून राज्यपालांना जाब विचारला असता!

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

नाशिक : भाजपचे (BJP) नेते आणि कार्यकर्ते यांना छत्रपती शिवाजी महाराज, (Chhatrapati Shivaji Maharaj) मराठी माणूस आणि मराठी विषयी कधीच प्रमे नव्हते. तसे नसते तर राज्यपालांनी (Governer) जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तेव्हा त्यांना राज्यपालांना जाब विचारला असता. किमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी तरी तसे करण्याचे धाडस दाखवले असते, मात्र ते तसे करू शकलेले नाहीत, असे शिवसेना (Shivsena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. (Atleast CM Eknath Shinde should have ask Governer on this issue)

Sanjay Raut
Shivsena : ओमराजे म्हणतात, भाजपला मैदानात तर येवू द्या, आत्ताच कशाला अंगावर घेवू..

येत्या फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या दौऱ्यात गोल्फ क्लब मैदानावर सभा होईल. या सभेच्या नियोजनासाठी संजय राऊत आज नाशिकला आले. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

Sanjay Raut
अजितदादाच्या 'त्या' विधानावर भाजप आक्रमक; वाहनांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर लावून आंदोलन

आज नाशिकमध्ये त्यांचे आगमन झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, शिवसेना हा महावृक्ष आहे, पानगळ होते, नवी पालवी फुटते, त्यामुळे शिवसेना हा बहरलेला वृक्ष असून त्याची ताकद काय आहे, हे आगामी निवडणुकीत दिसेल.

आपण सर्व तेव्हा भेटूच. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन पाच कोटी लाख रुपयांची गुंतवणूक नेली. असे असेल तर मग महाराष्ट्रात आमचे मुख्यमंत्री काय करताय?. त्यांचे वर्हाड बर्फ उडवायला जर्मनीत चालले आहे. इकडे योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्र्यांच्या नाकासमोरून पाच लाख कोटींची गुंतवणूक ओढून नेली. मात्र मुख्यमंत्र्यांना काहीही करता आलेलं नाही.

खासदार राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर यांची वाचा गेली आहे. मुळात भारतीय जनता पक्षाच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हतं, काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांची तुलना मोदींशी केली होती. त्यानंतर मुंबईत मोठ मोठे होर्डिंग लागले. यांना मराठी माणूस, मराठी साम्राज्य याच्याविषयी प्रेम नाही. जर ते प्रेम खरोखर असतं तर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री राजभवनाच्या दरवाजावर लाथ मारून आत गेले असते.

छत्रपती शिवरायांचा राज्यपालांनी जो अपमान केला आहे, त्याचा जाब विचारला असता. संपूर्ण सरकार दिल्लीला आलं असत, अमित शहाला भेटून सांगितलं असतं, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना त्वरित पायउतार करा, केलं का नाही? असा सवाल संजय राऊत याची केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com