Amit Shah Sharad Pawar Uddhav thackeray  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amit Shah : "खोटारडेपणा करून मुख्यमंत्री बनलेल्या..." शिर्डीतील अधिवेशनातून अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Amit Shah On Uddhav Thackeray : भारतीय जनता पक्षाचं प्रदेश महाविजय अधिवेशन आज शिर्डीत (ता.12) पार पडत आहे. या अधिवेशनसाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते शिर्डीत दाखल झाले आहेत. या अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Jagdish Patil

Shirdi Newsm 12 Jan : भारतीय जनता पक्षाचं (BJP) प्रदेश महाविजय अधिवेशन आज शिर्डीत (ता.12) पार पडत आहे. या अधिवेशनसाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते शिर्डीत दाखल झाले आहेत. या अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या.

दरम्यान, या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. 2019 ला आमच्यासोबत दगाफटका आणि खोटारडेपणा करून मुख्यमंत्री बनलेल्या उद्धव ठाकरेंना तुम्ही त्यांची योग्य जागा दाखवली असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

अमित शाह म्हणाले, "महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर पहिल्यांदाच आपण एकत्र आलो आहोत. तुम्हाला माहिती नाही की तुम्ही किती मोठं काम केलं आहे. तुम्हाला वाटतं असेल की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले, तुमचे आमदार मंत्री झाले. शिवाय खरी शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील मोठा विजय मिळवला.

पण या महाविजयाने 1978 पासून शरद पवारांनी जे दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं त्याला सुरूंग लावला. शिवाय उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आमच्यासोबत जो दगाफटका केला. 2019 ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांना सोडून खोटारडेपणा करून मुख्यमंत्री बनले, त्या उद्धव ठाकरेंना तुम्ही त्यांची योग्य जागा दाखवण्याचं काम केलं," असं म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचलं.

शिवाय राज्यातील अस्थिर सरकारचा इतिहास मोडत तुम्ही आता मजबूत फडणवीस सरकार स्थापन केल्याचंही शाह म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळवून देण्याचा संकल्प करूया आणि सर्व जागा जिंकूया असं आवाहन उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT