
Buldhana News, 12 Jan : "जालन्याचा गडी ऐकायला तयार नाही, नक्कल करतोय, माझ्या लेकरांना द्या म्हणत आहे, पण आरक्षण मिळाले म्हणजे नोकरी मिळते याला कोणी सांगितलं," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना डिवचलं आहे. ते शेगावमधील माळी समाजाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळांनी विविध मुद्यांवर आपलं मत व्यक्त केलं. शिवाय माझ्यावर अन्याय होत असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. ते म्हणाले, "माझ्यावर अन्याय होत आहे. पण मी अद्याप खचलो नाही, अजून लढाई संपलेली नाही मी लढत राहणार."
इतर समाजाला सरकारकडून शिक्षणासह इतर गोष्टींसाठी पैसा मिळतो तसा ओबीसी (OBC) समाजाला मिळत नाही. मी मराठा समाजाविरोधात नाही. पण त्यांना वेगळे आरक्षण द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला तर मी त्याला पाठिंबा देईल, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, याच कार्यक्रमातून त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ओबीसी कोट्यातूनच आरक्षण देण्याच्या मागणीवरून त्यांनी जरांगेंना टोला लगावला. ते म्हणाले, जालन्याचा गडी ऐकायला तयार नाही. नक्कल करत आहे . माझ्या लेकरांना आरक्षण द्या म्हणतोय, आरक्षण मिळालं म्हणजे नोकरी मिळते याला कोणी सांगितलं? असा सवाल करत त्यांनी जरांगेंची खिल्ली उडवली.
शिवाय ज्याप्रमाणे मराठा समाजचे 58 मोर्चे निघाले तसे गुजरातमध्येही पाटीदार समाजाचे निघाले. त्यांना 10 टक्के आरक्षण दिले. साडे आठ टक्के दिल्यानंतर त्यांनी आंदोलने थांबली मात्र यांची आंदोलन सुरूच आहेत, असं भुजबळ म्हणाले. तसंच यावेळी त्यांन ओबीसींवर हल्ले केल्याची आठवण करून देत लढाई अजून संपलेली नाही, ती सुरूच असल्याचंही वक्तव्य केलं.
ते म्हणाले, "बीडमध्ये क्षीरसागर यांचं घर जाळलं. घरात लहान मुलं होती, त्यांच्या कुटुंबातील सर्वांना झाला. शिवाय आमच्या कार्यकर्त्यांचं घरं जळालं, प्रकाश सोळंके यांचे घर जाळलं. अनेक ठिकाणी गट तयार होते असा गंभीर आरोप करत लढाई अजून संपलेली नाही, ती सुरूच आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.