Yuva sena meeting
Yuva sena meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yuva sena news; विद्यापीठाकडून भाजपच्या सदस्यांवर पैशांची उधळपट्टी

Sampat Devgire

धुळे : (Dhule) भाजप (BJP) पुरस्कृत संघटनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांच्या पैशाचा भ्रष्टाचार (Corruption) होत आहे. विद्यार्थ्यांच्या (Students) संचपत्रिकेच्या दरात देखील मोठा घोटाळा झाला आहे. विद्यापीठ (University) समन्वयक व प्रशिक्षक हे जणू विकास मंचाचे जावई असल्यागत त्यांच्यावर पैशांची उधळण केली जात असल्याचा आरोप युवासेनेचे (Yuva sena) सिनेट सदस्य पदाचे उमेदवार उमेदवार विष्णू भंगाळे (Vishnu Bhangale) यांनी केला. (Yuva sena criticiz BJP for politicised University)

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवासेना सहसचिव वरुण सरदेसाई यांच्या सूचनेनुसार धुळ्यात युवासेनेची आढावा बैठक झाली. या बैठकीत युवासेना संघटन मजबुतीसह उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत सिनेट सदस्य निवडणुकांसंदर्भात उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख तथा जळगाव जिल्ह्याचे माजी महापौर व सिनेट सदस्य पदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विष्णू भंगाळे, अंकित कासार, पंकज पाटील हे उमेदवार उपस्थित होते.

श्री. भंगाळे यांनी विद्यार्थी विकास मंच या भाजप पुरस्कृत संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पैशातून भ्रष्टाचार होत असल्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या संचपत्रिकेच्या दरातील घोटाळ्याचा आरोप केला. विद्यापीठ समन्वयक व प्रशिक्षक हे जणू विकास मंचाचे जावई असल्यागत त्यांच्यावर पैशांची उधळण करून तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या टेंडरमध्येदेखील अवाजवी दर आकारून मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट देऊन विद्यार्थ्यांचा पैसा वाया घालविण्याचे काम हे लोक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

युवासेना सहसचिव व विस्तारक चैतन्य बनसोडे, उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडिया व युवासेना विस्तारक मनीष (शंभू) बागूल, युवासेना विस्तारक प्रियंका जोशी यांनीही मार्गदर्शन केले. युवासेना युवकांसाठी काम करत राहील तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही युवासैनिक नव्या जोमाने काम करतील असा निर्धार बैठकीत झाला.

दरम्यान, मनीष माळी यांच्यासमवेत जुने धुळे परिसरातील तसेच धुळे ग्रामीणमधील युवकांनी युवासेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, महानगरप्रमुख धीरज पाटील, विधानसभा संघटक ललित माळी तसेच युवासेनेचे महाराष्ट्र सहसचिव यशवर्धन कदमबांडे, जिल्हाप्रमुख हरीश माळी, आकाश कोळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, महानगरप्रमुख सिद्धार्थ करनकाळ, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनी सोनार, नेहा वाघयांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT