Congress : पटोलेंची डोकेदुखी वाढली; तांबेंच्या समर्थनार्थ पहिला राजीनामा : काँग्रेसमध्ये दोन गट

Ahmednagar Congress : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांचा राजीनामा
Satyajit Tambe, Balasaheb Salunkhe, Nana Patole
Satyajit Tambe, Balasaheb Salunkhe, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Congress : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यावरून आता काँग्रेसमध्ये फूट पडली असल्याचे पाहायला मिळत आहे.

''सत्यजीत तांबे यांच्यावर अन्याय झाला आहे'', असे म्हणत अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Satyajit Tambe, Balasaheb Salunkhe, Nana Patole
Devendra Fadanvis : जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे प्रश्न हे काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे पाप, ते आम्ही सोडवू...

अहमदनगर (Ahmednagar) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी काही दिवसांपूर्वी आपण तांबेंचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्षातूनच टीका झाली होती. यानंतर बुधवारी (ता.25 जानेवारी) बाळासाहेब साळुंखे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

Satyajit Tambe, Balasaheb Salunkhe, Nana Patole
Bjp News : फडणवीसांच्या कार्यक्रमांना न जाणाऱ्या पंकजा मुंडेंना आता बॅनरवरही जागा नाही..

अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्यावर अन्याय झाला आहे. या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे बाळासाहेब साळुंखे म्हणाले आहेत. याआधी बाळासाहेब साळुंखे (Balasaheb Salunkhe) यांनी तांबेंना पाठिंबा जाहीर केला होता.

त्यामुळे काँग्रेसने (Congress) साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. मात्र, साळुंखे यांनी या नोटीसीला उत्तर दिले नाही. तर आज त्यांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे पाठवून दिला आहे.

Satyajit Tambe, Balasaheb Salunkhe, Nana Patole
Uddhav Thackeray News : राठोड, कदम, गोगावलेंनंतर आता दादा भुसेंचा नंबर; ठाकरेंनी डाव टाकला

दरम्यान, काँग्रेसने तांबे यांच्यावर अन्याय केला असून त्याचा निषेध म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे बाळासाहेब साळुंखे यांनी यावेळी म्हटलं आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवरच आता साळुंखे यांनी राजीनामा दिल्यामुळे ते आता पुढे काय भूमीका घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com