Ajit Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News : भाजपच्या पायगुणामुळेच आमदार नव्हे तर मंत्री झालात; अजितदादांच्या मंत्र्यांच्या विधानाला प्रत्युत्तर

Political News : सिन्नर विधासभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

Sachin Waghmare

Nashik News : सिन्नर विधासभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून त्यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून भाजपमध्ये गेल्यानंतर अन् तिकीट मिळाल्यानंतर तो आमदार होतो, असेच काहीसे आता प्रचलित झाले आहे. मात्र, मीच कसा काय आमदार झालो नाही? अशी खंत कोकाटे यांनी व्यक्त केली होती. त्याला जोरदार प्रत्युत्तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे.

राज्याचे कृषिमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कोकाटे यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी त्यांच्या पाच टर्ममधील इतिहासाचं सांगितला. त्यावेळी काँग्रेस पक्ष इतका मोठा होत की, फक्त आधी काँग्रेसचे तिकीट घेऊन यायचे की मंत्री आमदार व्हायचे, असे वातावरण त्याकाळी पहावयास मिळत होते.

त्यानंतर गेल्या दहा ते 15 वर्षांपासून काळ बदलला आहे. आताही तसेच चालले असून भाजपमध्ये गेले अन् तिकीट मिळाले की आमदार होतो. मीच कसा आमदार झालो नाही? मलाच माहिती नाही. सगळीकडे निवडून आलो आणि नेमकं भाजपमध्येच हरलो. मला तो पक्ष लकी नव्हता, असे विधान कोकाटे यांनी केले.

कोकाटे यांच्या या विधानानंतर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. तर आपण राज्याचे मंत्री झाला नसतात. भाजपने (Bjp) सरकार बनवायला पुढाकार घेतला. म्हणून तुम्ही मंत्री झाला आहात. त्यामुळे भाजपच्या पायगुणामुळे मंत्री झालात. याची जाणीव आणि भान कोकाटे यांनी ठेवावे, असे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले.

मंत्री कोकाटे यांनी केलेल्या या विधानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार दरेकर यांनी टोला लगावला. त्यामुळे कोकाटे आणि त्यानंतर दरेकर यांनी दिलेल्या प्रत्युत्तरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT