Girish Mahajan Vs Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Vs Eknath Khadse : खडसेंच्या प्रहारांसमोर महाजनांच नमतं? वरिष्ठांच्या सूचना असल्याची कुजबूज?

BJP Minister Girish Mahajan Responds to Jalgaon MLA Eknath Khadse Allegations in Nashik : आमदार एकनाथ खडसे करत असलेल्या आरोपांना भाजप मंत्री गिरीश महाजन कोणत्यापद्धतीनं उत्तर देणार?

Pradeep Pendhare

Nashik political : जळगावमधील ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय द्वंद दिवसेंदिवस वाढत असलं, तरी ते आता मनोरंजन ठरू लागलं आहे. दोघेही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. एकनाथ खडसे चढवत असलेल्या कडक हल्ल्यांना मंत्री महाजन देखील त्याच भाषेत प्रत्युत्तर देत होते.

पण आता मंत्री महाजन यांनी काहीसं नमतं घेण्याची भूमिका घेतली आहे. 'माझ्याबाबत कितीही खालची भाषा वापरत असले, तरी मी अशी भाषा वापरणार नाही', अशी भूमिका मंत्री महाजन यांनी घेतली आहे. मंत्री महाजन यांनी घेतलेल्या या भूमिकेमागे वरिष्ठांच्या सूचना असल्याचेही माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि भाजप (BJP) मंत्री गिरीश महाजन यांच्यात एकमेकांविरोधात आरोपांचा राळ उडाली आहे. एकमेकांची जुणी धुणी काढून टीका करत आहे. मालमत्ता कशा हडप केल्या इथंपर्यंत हे वाद पोचले आहे. दिल्लीत लोटांगण घातल्याचे मंत्री महाजन यांनी म्हटलं होते. एकनाथ खडसे यांनी मंत्री महाजन यांच्या मालमत्तेची यादी आता मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे थेट इशारा दिला आहे.

भाजप मंत्री महाजन नाशिक इथं सिंहस्थ कुंभमेळानिमित्ताने आयोजित बैठकीला आले होते. त्यावेळी एकनाथ खडसे (Eknath Khadse) देत असलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली. 'त्यांना माझ्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी ते माझ्या नावाचा वारंवार उल्लेख करतात. त्यांनी माझ्याबाबत कितीही खालची भाषा वापरत असले, तरी मी अशी भाषा वापरणार नाही', असे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे.

कारागृहांतील साहित्य खरेदीत भ्रष्टाचार

राज्यातील कारागृहांतील साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. यात जळगावच्या एका मंत्र्याचा समावेश असल्याचा आरोप खडसेंनी मंत्री महाजन यांचा नामोल्लेख टाळत केला. यावर बोलताना मंत्री महाजन यांनी, 'या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. परंतु, उठता-बसता खडसेंना मीच दिसतो. ज्या पद्धतीने ते कमरेखालची भाषा करत आहेत, तशी भाषा मी करणार नाही'.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचं आव्हान

नाशिकमध्ये साधूग्रामसाठी 1500 एकर जमीन आरक्षणाची साधू-महंतांची मागणी आहे. याबबत जमीन मालकांशी चर्चा सुरू आहे. जमीन मालकांनाही योग्य मोबदला मिळावा, अशी आमचीही भूमिका आहे. गेल्यावेळेच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापेक्षा यंदाच्या कुंभात अधिक गर्दी होणार आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील कुशावर्तात साधू-महंतांसह भाविकांच्या 'अमृत'स्नानाची सुविधा करणे ही आव्हानात्मक बाब आहे. त्यामुळे भाविकांना स्नानासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करावी, असा पर्याय काही साधू-महंतांनी सुचविला. पण काही आखाड्यांचा त्यास विरोध असल्याने चर्चेतून तोडगा काढण्यात येईल, असे मंत्री महाजन यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT