Hookah ban Karnataka : मोठा निर्णय, राज्यात हुक्का बारवर पूर्ण बंदी; तंबाखू खरेदीसाठी वयाची अट अन्...

Karnataka Government Imposes Complete Ban on Hookah Bars Under New Tobacco Control Law : कर्नाटक राज्य सरकारच्या सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने सुधारणा कायदा 2024 ला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली.
Hookah ban Karnataka
Hookah ban KarnatakaSarkarnama
Published on
Updated on

Tobacco law Karnataka 2025 : कर्नाटक राज्य सरकारने हुक्का बारवर पूर्णपणे बंदी घातली. तसेच तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्याचे कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे केले. दरम्यान, राष्ट्रपतींनी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातींवर बंदी आणि व्यापार आणि व्यावसायिक उत्पादन, पुरवठा आणि वितरणाचे नियमन) कर्नाटक सुधारणा कायदा-2024 ला मंजुरी दिली.

हे विधेयक फेब्रुवारी 2024 मध्ये दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे. 2003 च्या केंद्रीय कायद्यात हे नियम कर्नाटक राज्यात लागू करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते.

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर सरकारने आता अधिसूचना जारी केली आहे. राज्यात 21 वर्षांखालील व्यक्तींना सिगारेट आणि तंबाखूजन्य (Drugs) पदार्थ विकले जाणार नाहीत. तंबाखू उत्पादने खरेदी करण्यासाठी सध्याचे किमान वय 18 वर्षे आहे. आता ते वय 21 वर्षे केले आहे.

कोणत्याही शैक्षणिक (Education) संस्थेच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यास मनाई आहे. कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ वापरू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि व्हेपिंगला परवानगी नाही.

Hookah ban Karnataka
Sanjay Raut Dhule : 'खोली क्रमांक 102, बनली 'सिम्बॉल''; संजय राऊतांना पाहण्याचा मोह अन् मोठी मागणी... (VIDEO)

हुक्का बार उघडणे, विकणे किंवा चालवणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. कोणतीही व्यक्ती रेस्टॉरंट, पब, बार किंवा रेस्टॉरंटसह कोणत्याही ठिकाणी हुक्का बार चालवू शकत नाही.

Hookah ban Karnataka
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्याची तारीख जाहीर, 'या' तारखेपासून होणार सुरु

200 वरून 1000 रुपयांचा दंड

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना 200 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे. हुक्का बार चालवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही एक वर्ष ते तीन वर्षांपर्यंत कारावास आणि किमान 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

स्वतंत्र ‘स्मोकींग झोन’ला मान्यता

तीस खोल्या असलेल्या हॉटेल्स किंवा तीस किंवा त्याहून अधिक व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या रेस्टॉरंट्स आणि विमानतळांमध्ये ‘स्मोकींग झोन’ (धूम्रपानासाठी जागा) किंवा ठिकाण उपलब्ध करून दिले जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com