BJP Nitesh Rane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kanifnath Yatra : पुन्हा ठराव घ्या, बघतोच कसा रद्द होतो; मंत्री राणेंचा महाराष्ट्रभर निर्णयाच्या इशाऱ्यानं तणाव

BJP Nitesh Rane Pathardi Madhi gram panchayat ban Muslim traders Kanifnath Yatra : पाथर्डीतील कानिफनाथ यात्रेतील मुस्लिम व्यापाऱ्यांच्या बंदीच्या ठरावाला समर्थन देत मंत्री नीतेश राणेंनी प्रशासनाला दिलं आव्हान.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामपंचायतीने कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घातल्याच्या ठरावाला भाजप मंत्री नीतेश राणेंनी समर्थन दिले.

"मढी ग्रामपंचायतीचा ठराव जरी बीडीओने रद्द केला असला, तरी पुन्हा ग्रामसभा घेऊन नव्याने ठराव करा. ग्रामस्थांनी ठरावावर सह्या केल्यावर, मी बघतो बीडीओ कसा हा ठराव रद्द करतो, असे म्हणत, हिंदू धर्माला आव्हान दिल्यास मढीसारखा ठरावा संपूर्ण महाराष्ट्रात घेऊ", असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला. मंत्री राणे यांच्या या इशाऱ्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मंत्री राणेंच्या या इशाऱ्यामुळे सत्ताधारी देखील अस्वस्थ झाले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

मढी ग्रामपंचायतीने कानिफनाथ यात्रेत मुस्लिम (Muslim) व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव घेतला. या ठरावामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या ठरावावर विरोधक आक्रमक झाले असून, ग्रामपंचायतीच्या सरपंचांबरोबर सदस्यांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पाथर्डी पंचायत समितीने ग्रामपंचायतीचा हा वादग्रस्त ठराव रद्द केला आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने हिंदू सभा घेतली. भाजप (BJP) मंत्री नीतेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप या सभेत सहभागी झाले होते. मंत्री राणे यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत, प्रशासनालाच आव्हान दिले.

मंत्री राणे म्हणाले, "मढी ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णयाने इतिहासात रचणारा आहे. जिहाद्यांना त्यांची जागा दाखवली. हिंदू धर्माला आव्हान दिल्यास असे निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात घेऊ. राज्यभरात या समाजामधील लोकांनी केलेले अतिक्रमण काढली जात आहेत. जो धर्म जिहादी आहे, त्यांच्यात मूर्तीपूजेला विरोध आहे, त्या लोकांना आपल्या यात्रेत दुकाने का लावू द्यावी?"

ठराव कसा रद्द होतो, ते पाहतो

मंत्री नीतेश राणे यांनी मढी ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे समर्थन करत राज्यातील हिंदू जनतेने मतदान केले म्हणूनच आम्ही आमदार, मंत्री झालो.राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे हे सरकार राज्यातील हिंदूंच्या मागे उभे आहे. मढी गावचा ठराव जरी बीडीओने रद्द केला असला, तरी पुन्हा ग्रामसभा घेऊन नव्याने ठराव करा. सर्व ग्रामस्थांनी ठरावावर सह्या केल्यावर, मी बघतो बीडीओ कसा हा ठराव रद्द करतो, असा इशारा दिला.

घरावरही दावा करतील

आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या धार्मिक स्थळांवर दावा करण्याची यांची पद्धत सर्वांना माहित आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या जागेवर देखील दावा केला होता. उद्या आपल्या घरावरही ते दावा करतील. मढी ग्रामपंचायतीने त्यांना लांब ठेवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. ही सुलेमान वळवळ ठेचलीच पाहिजे. औरंग्याचे थडगे कशासाठी ठेवायचे? ते आपल्याला उखडून टाकायचे आहे, अशी आक्रमक भूमिका घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT