Jayant Patil latest news : बीड ते केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीपर्यंत..; जयंत पाटलाचं महायुती सरकारसाठी 'कवर फायर'

Jayant Patil Maharashtra law and order crime Beed Union Minister Jalgaon : एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था निर्ढावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे बिघडल्याची टीका केली.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil criticism Maharashtra : महायुती सरकारला घेरण्याची, त्यांच्यावर टीका करण्याची संधी विरोधक सोडत नाहीत. पण अलीकडे विरोधकांमधील दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची महायुती सरकारशी जवळीक वाढल्याचे दिसते. त्यामुळे पाटलांच्या प्रत्येक कृतीकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष आहे.

महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायद्या-सुव्यवस्थेवरून विरोधक महायुती सरकारवर तुटून पडले असतानाच, जयंत पाटील यांनी महायुती सरकारच्या बचावासाठी महाराष्ट्र पोलिस दलातील निर्ढावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर टीका केली. महायुती सरकारसाठी जयंत पाटलांचे हे 'कवर फायर' विरोधकांच्याही नजरेतून सुटलेलं नाही.

भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्री यांच्या मुलीची छेड काढण्यात आली. यावर जयंत पाटील यांनी राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणी असुरक्षित आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींचीच छेडछाड होते आणि याची पोलिस दखल घेत नाहीत. यावरून पोलिस किती निर्ढावलेले आहेत आणि राज्यातील पोलिस यंत्रणा महिलांच्या बाबतीच्या केस घेण्यासाठी कशी चालढकल करते, याचा धक्कादायक प्रकार जळगावमधील घटनेतून समोर येत आहे. यातून महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था कशी आहे, हे दिसून येते, अशी केली.

Jayant Patil
Karjat-Jamkhed APMC: Rohit Pawar आणि Ram Shinde यांच्यात काँटे की टक्कर | NCP | BJP | Sarkarnama

जयंत पाटील यांनी याचवेळी बीड (BEED) दलातील 107 पोलिसांनी बदलींसाठी केलेले मागणीवर खरमरीत टीका केली. "पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. पण आता त्यांच्या लक्षात आले आहे की, आतापर्यंत जे आपण इथं करायचो ते आता यापुढे होणार नाही. त्यामुळे अधिकची रोजी-रोटी मिळायची ती आता बंद झाली. त्यामुळे दुसरा जिल्हा गाठलेला बरा", अशा शब्दात आमदार जयंत पाटलांनी पोलिस अधिकाऱ्यांना टोला लगावला.

Jayant Patil
Guardian Minister : अमित शाहांनी 'नाशिक'चा तर फडणवीसांनी 'रायगड'चा तिढा सोडवला? मोठी राजकीय घडामोड

जयंत पाटलांची भाजपशी जवळीक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या त्यांच्या महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कांमुळे चर्चेत आहेत. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा त्यांच्या संस्थेतील दौरा, त्यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेली गुप्तगूमुळे जयंत पाटील चर्चेत आले आहेत.

जयंत पाटलांनी कोणाला दिला दोष...

जयंत पाटील यांचा महायुतीमधील नेत्यांशी वाढलेला संपर्कामुळे ते लवकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. विशेष म्हणजे, जयंत पाटील यांनी या चर्चांचे वारंवार खंडन केले आहे. पण राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यस्थेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याला विरोधकांकडून टार्गेट होत असतानाच, जयंत पाटील यांनी याचा दोष पोलिस दलातील निर्ढावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना दिला आहे. जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीका करण्याचे टाळले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com