Ahilyanagar Shirdi : केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डी इथून भारतमालामधील 42 हजार कोटी रुपयांच्या प्रोजेक्टची पुन्हा घोषणा केली.
हा प्रोजेक्ट भूमि अधिग्रहणामुळे बंद पडला होता. परंतु हा प्रोजेक्ट पुन्हा सुरू करण्यासाठी कॅबिनेटसमोर प्रस्ताव ठेवला असून, पुढील महिन्यात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, असे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांनी सुरत-नाशिक (Nashik)-अहिल्यानगर-सोलापूर-अक्कलकोट-चेन्नई, हा 'भारतमाला'मध्ये प्रोजेक्ट होता. एकंदर ही लांबी 1600 किलोमीटरची आहे. यामुळे 320 किलोमीटर दिल्ली-चेन्नईचं मार्ग कमी होणार आहे. हा अॅक्सिस कंट्रोल महामार्ग आहे. विशेषता नाशिक-आहिल्यानगर-बीड-धाराशिव-सोलापूर या जिल्ह्यातून जातो, असे सांगितले.
या प्रोजेक्टनुसार नाशिक 122, अहिल्यानगर 141, बीड 38, धाराशीव 86, सोलापूर 84 किलोमीटरचा आहे. भूमि अधिग्रहणामुळे 'भारतमाला', हा प्रोजेक्ट रद्द झाला. त्यामुळे प्रकल्पाला पुन्हा मान्यता घेण्यासाठी कॅबिनेटकडे गेलो आहोत. एक महिन्याच्या आत कॅबिनेटची मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे (Farmers) भूमि अधिग्रहणाचे पैसे अडकले आहेत, ते ताबडतोब त्यांना मिळतील, आणि या रस्त्याचे काम लगेच सुरू होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
या प्रकल्पाकरता 4 हजार 231 हेक्टर जमीन आम्ही घेणार आहोत. 42 हजार कोटी रुपयांचे काम आहे. या रस्त्यामुळे दिल्लीहून म्हणजे, उत्तरेकडून दक्षिणकडे जाण्याकरीता, मुंबई-पुणे-सोलापूर-कोल्हापूर जाण्याची गरज नसणार आहे. दिल्लीहून-सुरत, सुरतवरून-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर, तर सोलापूरवरून-करनूल-चेन्नई-कन्याकुमारी-हैदराबाद-बंगळूर-कोचीन-त्रिवेंद्रंम, म्हणजे सगळ्या दक्षिणेला वाहतूक जाणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
नाशिक ते सोलापूर हे अंतर 135 किलोमीटरने, तर सुरत ते चेन्नईचे अंतर 320 किलोमीटरने कमी होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता असणार आहे. रस्त्याचे केंद्र सरकार भूमिअधिग्रहण करत असताना, महाराष्ट्र सरकारने काही जागा घेतल्यास, तिथं लॉजिस्टिकपार्क, औद्योगिक कलस्टर तयार केली जातील, अशी सूचना नितीन गडकरी यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केला. 'हॉर्ट लाईन'वर हा रस्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात औद्योगिक विकासात भर पडणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्याचा विचार करावा, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.