Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishana Vikhe: भाजप मंत्र्यांचा सरनाईकांच्या परिवहन खात्याच्या कारभारावर संताप; म्हणाले, 'हा हलगर्जीपणाच...'

Minister Radhakrishna Vikhe On Pune Rape Case : पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगर शहरातील माळीवाडा आणि पुणे बसस्थानकाची पाहणी केली.

Deepak Kulkarni

Pune Rape Case Update : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संताप व्यक्त करताना, शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विभागाच्या बेपर्वाईच्या कारभारावर तुटून पडले. "मंत्री सरनाईकच्या एसटी विभागाचा हलगर्जीपणाच आहे. तिथल्या आगारप्रमुखाविरोधातच गुन्हा दाखल झालाच पाहिजे", अशी मागणी मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी दिली.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामधील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये युवतीवर अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. महायुती सरकारच्या कारभारावर, विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहविभागाला देखील विरोधकांनी टीकेचे लक्ष केले. या घटनेवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देताना शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या एसटी महामंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

मंत्री विखे म्हणाले, "घडलेली घटना निंदनीय आहे. त्याचा निषेधच करतो. यातून एसटी प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. बंद पडलेल्या अनेक बसेस उभ्या आहेत. त्यांचा वेगळ्याच कारणांसाठी वापर होत आहे. एसटी महामंडळाने त्यावर काम केले पाहिजे. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे". पण तिथला आगरप्रमुखाची मोठी जबाबदारी होती. त्याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी मंत्री विखेंनी केली.

मंत्री विखेंकडून जबाबदारी निश्चित

राज्यातील बहुतांश डेपोमध्ये बंद पडलेल्या गाड्या उभ्या आहेत, याकडे मंत्री विखे यांनी लक्ष वेधून अहिल्यानगर जिल्ह्यातील बस आगारांतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. बस स्थानक अन् आगारामध्ये सीसीटीव्ही बसवावेत, त्याची लिंक स्थानिक पोलिस ठाण्याकडे द्याव्यात. जुन्या बंद पडलेल्या बसेस निकाली काढल्या पाहिजे, अशा सूचना केल्या देण्याबरोबर असे प्रकार घडू नये, यासाठी पुढील काळात आगारप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

खासदार लंकेंकडून बसस्थानकाची पाहणी

दरम्यान, पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगर शहरातील माळीवाडा आणि पुणे बसस्थानकाची पाहणी केली. बसस्थानकातील स्वच्छतेचा उडालेला बोजवारा, बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे, बंद पंखे, बाकड्यांची तोडफोड, असुरक्षित कर्मचारी, यावरून खासदार लंके यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा वारंवार वाभाडे निघत आहेत. तरी देखील सर्वसामान्यांच्या सुरक्षितेसाठी या सरकारकडे काळीज नाही, असा टोला खासदार लंके यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT