Pratap Sarnaik On Swargate Crime: स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट; मंत्री सरनाईक 'अ‍ॅक्शन मोड'वर; दिले महत्त्वाचे आदेश

Swargate Rape Case : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे.एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी (ता.25) पहाटेच्या वेळी स्वारगेटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अत्याचाराची धक्कादायक घटना घडल्यानं पुणे हादरलं आहे.
Pratap Sarnaik On Swargate Crime.jpg
Pratap Sarnaik On Swargate Crime.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे.एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी (ता.25) पहाटेच्या वेळी स्वारगेटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अत्याचाराची धक्कादायक घटना घडल्यानं पुणे हादरलं आहे. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू असून त्यासाठी 8 पथकं रवाना झाली आहे.

यातच आता राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र,या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नव्हती. यामुळे राजकीय नेतेमंडळींकडून परिवहन मंत्र्‍यांवर टीकेची झोड उठवली जात होती. अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik ) या घटनेवर अॅक्शन मोडवर आले असून थोड्याच वेळात मोठे आदेश निघण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तसेच उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील स्वारगेट अत्याचार (Swargate Rape Case) प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा गांभीर्यपूर्वक तपास करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. आता याप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍यांचे चौकशीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे.तसेच लवकरच मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दोषींवर निलंबन कारवाईचे निर्देश दिले आहेत.

या घटनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित बसस्थानकावरील त्या वेळी कर्तव्य असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये ते दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे असे निर्देश दिले आहेत.

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आहे, या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोलले आहे. सीसीटीव्ही फुटेजही मी स्वतः पाहिले आहे. ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बसमध्ये नेलं आणि अत्याचार केला.

Pratap Sarnaik On Swargate Crime.jpg
Pune Crime News : मोठी बातमी! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीची ओळख पटली

तसेच या बसस्थांनकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक यांना तात्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्या ऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी. असे निर्देश दिले आहेत. याबरोबरच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील ७ दिवसात आपणास सादर करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) श्री. विवेक भिमानवार यांना दिल्या आहेत.

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आहे, या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोलले आहे. सीसीटीव्ही फुटेजही मी स्वतः पाहिले आहे. ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बसमध्ये नेलं आणि अत्याचार केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या,या घटनेने पुणे शहर हादरलं आहे.या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू आहे नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी लक्ष घालावं अशी मागणीही केली आहे.

Pratap Sarnaik On Swargate Crime.jpg
Rohit Pawar : स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार, रोहित पवारांनी सरकारला करून दिली 'शक्ती'ची आठवण!

या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.यात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे,काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर,शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हेही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सरकारवरचा दबाव चांगलाच वाढला आहे.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत शक्ती कायद्याची आठवण करुन दिली आहे. ते पोस्टमध्ये म्हणतात, पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. इतकेच नाही तर महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तत्काळ निर्णय होईल, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com