BJP minister Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्ह्यात गाजत असलेल्या सिस्पे घोटाळ्यावरून भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
सिस्पे घोटाळ्यावरून खासदार लंके यांना वारंवार लक्ष केलं जात असल्याने या घोटाळ्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून खासदार लंकेंनी विखे पिता-पुत्रांना इशारा देताच, मंत्री विखे पाटलांनी, 'जुना-नाव लंके काय आहे ते उघड करू, फरक देखील समजावून सांगू,' असा सूचक टोला लगावला आहे.
विखे पिता-पुत्रांनी सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जाऊन सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे जाहीर केले.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) प्रचारात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर खासदार लंके यांनी टीका केली होती. या घोटाळ्याशी आपला कोणताही संबंध नाही, आपणच शरद पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. परंतु विखे पिता-पुत्र वारंवार उल्लेख करून सर्वसामान्यांचं नेतृत्वाची बदनामी करत आहेत. माझ्यातील पहिला नीलेश लंकेंला बाहेर काढायला लावू नका, असा इशारा दिला होता.
खासदार लंकेंच्या या इशारावर बोलताना मंत्री विखे पाटील यांनी, पुन्हा डिचवलं आहे. ते म्हणाले, "या अशा धमक्या खूप पाहिल्या आहेत. पण त्यांना माहिती नाही की, ते राजकारणात नवीन आहे. कोण जुना-कोण नवा लंके, त्यांना पाहिजे असेल, तर मी फरक समजावून सांगेल." अशा गिधाड धमक्या देऊ नये, त्यांनी मला यावर, जास्त काही बोलायचं नाही आणि बोलायला देखील लावू नका, असा इशारा दिला.
सिस्पे घोटाळ्यावर बोलताना, मंत्री विखे पाटील म्हणाले, "या घोटाळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे पैसे अडकले आहेत. हा घोटाळा दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा आहे. यात शिक्षक, सरकारी नोकर अन् सामान्य नागरिक अडकले आहेत. मूळ आरोपीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. ते फरार आहेत. दोन आरोपी दुबईमध्ये आहेत. यासाठीच मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे आणि ती आता तत्वतः त्यांनी देखील मंजूर केली आहे."
'काही महाभाग आहेत की, सीबीआयची चौकशी मागणी करताच, त्यांना भीती वाटायला लागली आहे. यातून ते खुलासा करत आहेत. आमचा काही संबंध नाही म्हणून. पण आम्ही त्यांचे नाव घेतलेले नाहीत. काय भीती वाटते हे कळत नाही. चोराच्या मनात चांदणं आहे. त्यांचं मन त्यांना खात आहे. सीबीआय चौकशीमध्ये आपलं पितळ उघड पडणार आहे. त्यांना भीती वाटायला लागली आहे,' असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.