Municipal election cash seizure : दहा लाख, अडीच लाख अन् आता 18 लाख! महापालिका निवडणूक ‘पैशांच्या धुरळ्या’मुळे गाजतेय

Municipal Elections : Lakhs of Rupees Seized Across Mumbai, Navi Mumbai, Thane & Palghar : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडवल्या असल्या तरी छुप्या प्रचाराने वेग घेतल्याचे दिसते आहे.
Municipal election cash seizure
Municipal election cash seizureSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra municipal elections : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता छुप्या प्रचाराला वेग आला आहे. छुप्या प्रचारात कोठेही, कमतरता राहू नये, यासाठी पैशांचा वापर सुद्धा सुरू झाला आहे.

पुढचे 24 तास सर्व उमेदवारांची धाकधूक वाढवणारे असले तरी, छुप्या संपर्कावर अधिक भर राहणार आहे. याच काळात मोठ-मोठाले आर्थिक व्यवहार होऊन, विजयाची गणितं मांडली जाणार आहे. यासाठी छुप्यापद्धतीने पैशाचा खेळ सुरू झाला आहे. नालासोपारा, नेरूळ आणि उल्हासनगर इथं लाखो रुपयांच्या रक्कमा जप्तीची माहिती समोर आली आहे.

नालापोसारा इथं पेल्हार ब्रिज परिसरात पोलिसांनी (Police) दोन युवक वेगवेगळ्या दुचाकीवरून चालले असताना, त्यांच्याकडून दहा लाख नऊ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही दोन युवक दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरत होती. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे प्लास्टिक पिशवीत वेगवेगळ्या पाकिटांमध्ये पैसे भरलेले आढळले. ही रक्कम दहा लाख नऊ हजार रुपये इतकी होती.

ही रोकड जप्त झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ही रक्कम भाजपकडून (BJP) मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वाटण्यात येणार होती, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला. मात्र, भाजपने हे सर्व आरोप फेटाळले. मतदानाच्या एक दिवस अगोदर ही रक्कम पकडल्याने मतदारांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. नालासोपारा इथल्या या रक्कमप्रकरणी पेल्हार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 173 (निवडणुकीत लाच देणे किंवा स्वीकारणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Municipal election cash seizure
Sujay Vikhe speech : जगतापांसमोर विखेंचा राजकीय ‘एक्स-रे’; दाढी, कटिंग, चष्मा, घड्याळ… काहीच सुटलं नाही!

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे. नेरुळ परिसरात पोलिस व निवडणूक पथकाने सुमारे अडीच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसंच या रकमेबरोबर मतदारांची यादी होती. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Municipal election cash seizure
Chandrashekhar Bawankule: निवडणुकीची धामधूम, प्रचाराचा अखेरचा दिवस; याच राजकीय धावपळीत बावनकुळेंचा 'बर्थ डे'; पण मिळालं मोठं गिफ्ट

निवडणूक निरीक्षण पथक व स्थानिक पोलिसांनी छाप्यात रोख रक्कमेसह मतदारांची छायांकित यादी, काही कागदपत्रे व मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही रक्कम मतदारांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणार होती का? याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली असून, आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक कायद्यांतर्गत पुढील कारवाई केली जाणार आहे.

18 लाखांची रक्कम जप्त

दरम्यान, उल्हासनगर इथं देखील सुमारे 18 ते 20 लाखाची रोकड पकडल्याची माहिती समोर येत आहे. अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी पाठलाग करून ही रक्कम पकडल्याचे सांगितले जाते. इथल्या सुभाष टेकडी चौकात एका रिक्षातून ही रक्कम वाहतूक केली जात आहे. रिक्षा चालक आणि रोकड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महापालिका समोर असलेले भाजप प्रवक्ते प्रदीप रामचंदानी आणि यांच्या कार्यालयातून ही रक्कम निघाल्याचे, नरेश गायकवाड यांनी दावा केला आहे.

आयोगाच्या कारवाईचा लेखाजोखा

निवडणूक आयोगाने आतापर्यंत 8.85 कोटींची रोख रक्कम जप्त केली. याशिवाय 6.85 कोटी रुपयांचे मद्य, 52.48 कोटी रुपयाचे अमली पदार्थ तसेच 871 शस्त्रास्त्रे जप्त केली. तसेच निवडणुकीसंदर्भात 57 गुन्हे नोंदवले आहेत. आचारसंहिता भंगाच्या 295 तक्रारी आयोगाकडे आल्या. त्यापैकी 221 तक्रारी निकाली काढण्यात आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com