Sangamner Municipality Meeting : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संगमनेर दौऱ्यात छात्रभारतीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यासाठी घोषणाबाजी केल्याने गोंधळ उडाला. या छात्रभारतीच्या पदाधिकाऱ्याला मंत्री विखे यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेली वागणूक आता चर्चेत आली आहे.
बाळासाहेब थोरातांनी पाठवले का? शहाण्या? असे म्हणत, मंत्री विखेंना निवेदन देत असतानाच, हकलून दिले. काही कार्यकर्ते त्याच्या अंगावर देखील धावून गेले. त्यामुळे गोंधळ उडाला. काही पदाधिकाऱ्यांनी यावेळी संयमाची भूमिका घेतली होती.
भाजप (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे आज संगमनेर दौऱ्यावर होते. नगरपालिका कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. ही बैठक उरकून मंत्री विखे नगरपालिका कार्यालयातून बाहेर पडत असताना, छात्रभारतीच्या दोघा-तिघा कार्यकर्त्यांनी भाजप मंत्री नीतेश राणे यांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी सुरू केली.
याचवेळी मंत्री विखेंबरोबर असलेले कार्यकर्ते, घोषणाबाजी करणाऱ्या छात्रभारतीच्या पदाधिकाऱ्यांवर धाऊन गेले. कोणी पाठवलं रे, बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) का? शहाण्या, असे म्हणत दमदाटी सुरू केली. आम्ही निवेदन द्यायला आलो आहे, असे छात्रभारतीचे पदाधिकारी म्हणत होते.
मंत्री विखेंनी शांत व्हा, असे म्हणत निवेदन स्वीकारले. तेवढ्यात मंत्री विखेंबरोबर आजूबाजूला असलेले कार्यकर्ते आक्रमक झाले अन् छात्रभारतीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत तेथून काढून दिले.
मंत्री राधाकृष्ण विखे या गोंधळावर म्हणाले, "लोकशाही आणि राजकीय प्रक्रियेत या गोष्टी सुरू असतात. गोंधळ घालणारे कोण आहेत जे जनतेला माहीत आहे. त्यांचं मनावर घ्यायचं नाही. माझ्यावर अशा घोषणाबाजीचा परिणाम होत नाही".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.