Sina river encroachment Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sina river encroachment : सीना नदी झाली ‘गटार’! अतिक्रमणावरून मंत्री विखेंचा संताप; जगतापांसमोर प्रशासन धारेवर

Warning issued in presence of MLA Sangram Jagtap over illegal encroachments in Sina riverbed in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातून जात असलेल्या सीन नदी पात्रातील अतिक्रमणांवर चिंता व्यक्त करताना कारवाईचे संकेत भाजप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातून वाहणारे सीना नदीचे पात्र गटार झाले असून, अनेक अतिक्रमणे त्यात झाली आहेत. सरकारी जागा दिसली की त्यात अतिक्रमण करायचे, असा निर्णय इथं झालेला दिसतोय, असे जाहीर वाभाडे भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

वापरलेल्या 80 टक्के पाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी ट्रीटमेंट प्लांट हवा. पुण्यात फक्त 18 टक्के पाण्याचा पुनर्वापर होतो. अहिल्यानगर शहराची यादृष्टीने चर्चाच करायला नको, असे उपरोधिक भाष्यही त्यांनी केले.

साईद्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महापालिकेने 'पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) ग्रीन सिटी' मोहिमेअंतर्गत एका वर्षांत एक लाख वृक्षलागवडीचा प्रारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव आणि आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरात नियोजन नसलेला विकास झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहराची रचना बदलण्याची गरज आहे. 14 किलोमीटर अंतर असलेली सीना नदी पात्र शहरातून जाते, पण त्याला गटारीचे स्वरूप आले आहे, अतिक्रमणे आहेत. त्यामुळे आता नदीच्या ब्ल्यू व रेड लाईनमध्ये लक्ष घालणार आहे, असे संकेत मंत्री विखे पाटील यांनी दिले.

नदी स्वच्छ राहिली पाहिजे. अतिक्रमणे काढली पाहिजे. शहराचे रूप बदलण्यासाठी महापालिकेने अहमदाबाद इथल्या संस्थेला सल्लागार नेमून पुढील दहा वर्षात अहिल्यानगर शहराची रचना कशी, असावी याचे नियोजन करून घ्यावे, अशी सूचना मंत्री विखे पाटील यांनी या वेळी केली.

'ग्रीन सिटी'सारखा उपक्रम कौतुकास्पद

अहिल्यानगर शहर झपाट्याने विस्तारत असताना वाढते प्रदूषण ही मोठी चिंता आहे. या पार्श्वभूमीवर 'ग्रीन सिटी'सारख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारणे आवश्यक असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले. प्रत्येक भागात 'ग्रीन स्पेसेस' विकसित करण्याबरोबरच शहराच्या रचनेत पर्यावरणपूरक बदल करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

56 हजार एकर जमीन अतिक्रमणमुक्त

जलसंपदा विभागामार्फत धरण, नदी, नाले व अन्य परिसर मिळून सुमारे 56 हजार एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून, जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अहिल्यानगर शहर अधिक स्मार्ट बनविण्यासोबतच 'क्लीन अँड ग्रीन सिटी' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट ठेवावे, असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT