devyani pharande sarkaranama
उत्तर महाराष्ट्र

Devyani Pharande : देवयानी फरांदेंचे दोनदा हुकलेले मंत्रिपद यंदा तरी मिळेल का?

Mahayuti Cabinet expansion : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात यंदा नाशिकच्या देवयानी फरांदे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

Sampat Devgire

Cabinet expansion News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. यामध्ये पुन्हा एकदा नाशिकच्या देवयानी फरांदे यांचे नाव चर्चेत आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त फटका बसला. त्यातून सावरण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. त्यातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. यामध्ये अनेकांना मंत्री होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या नाशिक शहरातील आमदार देवयानी फरांदे ( Devyani Pharande ) यांचे यापूर्वीही दोन वेळा मंत्रिपदासाठी नाव घेतले जात होते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या धोरणी राजकारणाचा भाग म्हणून सहकारी पक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यात भाजपचे इच्छुक मात्र इच्छुकच राहिले होते.

यंदा मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या नाराज आमदारांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल टाकले जाणार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विविध सदस्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. त्यात नाशिकच्या आमदार फरांदे यांचेही नाव असल्याचे बोलले जाते.

सध्या नाशिक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पाच अजित पवार गटाचे सहा आणि शिंदे गटाचे दोन असे तेरा आमदार आहेत. जिल्ह्यात 15 पैकी 13 आमदार सत्ताधारी पक्षात असूनही त्याचा जिल्ह्याला फारसा उपयोग होऊ शकलेला नाही. सध्या भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आणि दादा भुसे हे दोघे मंत्री आहेत.

भाजपच्या आमदार फरांदे यांच्याबरोबरच आमदार डॉ. राहुल आहेर हे सुद्धा मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत. या दोन्ही नेत्यांनी त्यासाठी वरिष्ठांकडे मनधरणी आणि पाठपुरावा कायम ठेवला आहे. महायुतीच्या अन्य दोन घटक पक्षांमध्येही काही ज्येष्ठ सदस्यांना मंत्रिपदाचे डोहाळे आहेत. त्यामुळे आगामी विस्तारात नाशिकच्या कोणाला संधी मिळते, याबाबत आडाखे बांधले जात आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT