Chhagan Bhujbal : किशोर दराडेंच्या बैठकीला भुजबळांची दांडी, विसंवाद की इशारा?

Nashi Teachers constituency, Kishor Darade And Chhagan Bhujbal : शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाने आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी दिली आहे. ती महायुतीची उमेदवारी मानली जाते. मात्र नियोजनाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित होते.
Chhagan Bhujbal, Kishor Darade
Chhagan Bhujbal, Kishor DaradeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Teachers constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी बैठक झाली. या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अनुपस्थित होते. त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाने आमदार किशोर दराडे (MLA Kishore Darade) यांना उमेदवारी दिली आहे.

ती महायुतीची उमेदवारी मानली जाते. मात्र नियोजनाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित होते. या पक्षाच्या काही आमदारांनी मात्र या बैठकीला हजेरी लावली. त्यावरून एक नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार हे उमेदवार अद्याप रिंगणात आहेत. त्यामुळे आमदार दराडे हे महायुतीचे की शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाचे उमेदवार असा प्रश्न निर्माण होतो. या पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे आणि सरोज अहिरे हे दोन आमदार देखील दराडे यांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या बैठकीला उपस्थित होते. या आमदारांनी पक्षाने सूचना केल्यास भावसार यांचा प्रचार करू असं म्हटलं आहे.

Chhagan Bhujbal, Kishor Darade
Video OBC Reservation : "मराठा समाज फक्त 10 टक्के, OBC आरक्षणाला विरोध कराल, तर चुन-चुन के...", शिंदे सरकारला कुणी दिला इशारा?

आमदार दराडे आणि मंत्री भुजबळ हे दोघेही येवला तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. दराडे आणि भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात राजकीय संबंध सलोख्याचे नाहीत. किशोर दराडे यांचे बंधू नरेंद्र दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे हे भुजबळांच्या विरोधातील संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत. या राजकारणाचा भाग म्हणूनही भुजबळ या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार आमदार दराडे यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक झाली. यावेळी मंत्री भुजबळ नाशिकमध्येच होते मात्र ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. यातील नेमका राजकीय संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे.

Chhagan Bhujbal, Kishor Darade
Amol Kolhe Vs Ajit Pawar : 'खरी राष्ट्रवादी कुणाची हे स्ट्राईक रेटवरून ठरवा' ; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचलं?

त्यामुळे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दराडे यांना भुजबळ यांचे किती सहकार्य मिळते हा उत्सुकतेचा भाग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com