Dr. Rahul Aher & Shirish Kotwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandwad APMC : भाजपचे आमदार डॉ. राहूल आहेर यांना काँग्रेसचा दे धक्का!

काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांनी बाजार समितीची सत्ता पुन्हा हिसकावली

Sampat Devgire

BJP & Congress Politics : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना काँग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलने धक्का देत बाजार समितीमध्ये परिवर्तन घडवले. कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने दहा जागा जिंकल्या. (Congress leader Shirish Kotwal wins 10 seats)

भाजप (BJP) आमदार आहेर, (Dr. Rahul Aher) डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या शेतकरी विकास पॅनलला सात जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे अनेक वर्षानंतर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) परिवर्तन झाले आहे. प्रहारच्या गणेश निंबाळकर यांनी अपक्ष उमेदवारी करीत विजय संपादन केला.

माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर नेतृत्वाखाली लोकमान्य परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार असे, सहकारी संस्था गट : डॉ. सयाजीराव गायकवाड (५८८), कारभारी आहेर (५०३), डॉ. राजेंद्र दवंडे (४९०), सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून शिरीषकुमार कोतवाल (६३१) मते, सहकारी संस्था महिला राखीव प्रवर्गातून डॉ.वैशाली जाधव (६६१), मीना शिरसाठ (४३६), भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गात विक्रम मार्कंड (५१५) तर ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण प्रवर्गात संजय जाधव (४११), नितीन आहेर (४५४), व्यापारी गटातून सचिन अग्रवाल (१७०) विजयी झाले.

आमदार डॉ.राहुल आहेर व डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून डॉ.आत्माराम कुंभार्डे (५९१), पंढरीनाथ खताळ (४६३), सुखदेव जाधव (५२५), योगेश ढोमसे (५१२), ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात वाल्मिक वानखेडे (३९३) व्यापारी गटातून सुशील पलोड (१५८), हमाल मापारी गटातून रवींद्र पवार (७५) विजयी झाले. ग्रामपंचायत गटातील आर्थिक दुर्बल प्रवर्गातून अपक्ष गणेश निंबाळकर (२९५) विजयी झाले.

या निवडणुकीला विशेष महत्त्व होते. भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या चांदवड समितीत यंदा आमदार डॉ. राहुल आहेर यांनी लक्ष घातले होते. त्यांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस व त्यात कांदा दर कोसळले. या विषयावर काँग्रेसचे माजी आमदार कोतवाल यांनी जनजागृती करीत मोठे आंदोलन उभारले होते. त्यांतून त्यांचा जनसंपर्क वाढला होता. त्याचा या निवडणूक निकालावर परिणाम झाल्याचे बोलले जाते. यानिमित्ताने महाविकास आघाडीचे घटक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी काँग्रेसचे चांगले बाँडींग झाले.

एका मतांनी पराभव

शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवार गीता झाल्टे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. मीना शिरसाठ यांना ५३७ व गिता झाल्टे यांना ५३५ मते मिळाली. यानंतर गीता झाल्टे यांनी फेरमतमोजणीचा अर्ज दिला. नंतर या जागेसाठी फेरमतमोजणी करण्यात आली. त्यात मीना शिरसाठ याचे एक मत कमी होऊन त्यांना ५३६ मते मिळाली तर गीता झाल्टे यांचे ५३५ मते राहिली. त्यामुळे मीना शिरसाठ यांना विजयी घोषित करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT