Malegaon APMC News : पालकमंत्री दादा भुसे यांच्या पराभवामागे शिंदे गट?

बाजार समितीच्या निवडणुकीत अद्वय हिरे यांनी भुसे यांचा दारूण पराभव केला.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Malegaon APMC politics : राज्याचे लक्ष लागून असलेल्या येथील मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापित, व पालकमंत्री दादा भुसे यांची २० वर्षाची सत्ता गेली. शिवसेना ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांनी त्यांना धोबीपछाड देत बाजार समितीची निवडणुक जिंकली. मात्र त्यात काही वाटा शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचाही असल्याची चर्चा आहे. (Is Suhas Kande played a role in Dada Bhuse`s defeat)

जिल्ह्यात (Nashik) शिंदे गटाकडे (Eknath Shinde) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि सुहास कांदे (Suhas Kande) हे दोन आमदार आहेत. मात्र त्यांच्यात सख्य नव्हे तर राजकीय स्पर्धा आहे. त्यातून मालेगाव (Malegaon) बाजार समिती निवडणुकीतील भुसे यांच्या पराभवाला हातभार लागल्याची चर्चा आहे.

Dada Bhuse
Malegaon APMC : पालकमंत्री दादा भुसे यांना पराभवाचा धक्का; अद्वय हिरे जिंकले!

पालकमंत्री भुसे यांच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनलचा पराभव त्यांना धक्कादायक आहे. राज्यातील बदलत्या घडामोडी व मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध ठाकरे गटातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मिळालेला हा विजय विधानसभेसाठी हिरे गटाचे मनोबल वाढविणारा आहे.

बाजार समितीतील दोन दशकातील सत्ता राखण्यासाठी श्री. भुसे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी अनेक डावपेच आखत हिरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तथापी सुरवातीलाच आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास असमर्थता दर्शविल्याने माशी शिंकली. यातून शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.

Dada Bhuse
Nashik APMC : देविदास पिंगळे यांची शिवाजी चुंभळेंवर दणदणीत मात!

श्री. कांदे व त्यांच्या समर्थकांचे मन वळविण्यात भुसे यांची दमछाक झाली. अखेरच्या टप्प्यात श्री. कांदे यांनी प्रचारात सहभाग घेऊनही निमगाव व झोडगे मतदान केंद्रावर श्री. हिरे यांच्या पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते वेगळाच संकेत देतात. याशिवाय सत्तारुढ गटाविरुध्द सामान्य मतदारांमध्ये नाराजी असल्याचे बघावयास मिळाले. विद्यमान सभापती, उपसभापती यांच्यावरील टिकेचा मुद्दाही कळीचा ठरला.

बाजार समितीच्या कारभाराकडे श्री. भुसे यांनी फारसे लक्ष दिले नव्हते. भुसेंच्या समर्थकांनीही एकमेकांचा हिशेब चुकता केला. ग्रामपंचायत गटात बहुमत असूनही झालेला पराभव भुसे गटाला जिव्हारी लागणारा आहे. श्री. हिरे यांनी शिवसेना प्रवेश केल्यापासून कार्यशैलीत मोठा बदल केला आहे. सामन्यांमध्ये मिसळत मोठेपणा बाजूला ठेऊन व सर्वांना सोबत घेण्याची त्यांची तयारी अनेकांना भावली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फळी सक्रिय झाली.

Dada Bhuse
Pimpalgaon APMC : दिलीप बनकर यांचा गड अभेद्य, ११ जागा जिंकल्या!

बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव, भाजपचे सुनील गायकवाड, कॉंग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. जयंत पवार अशा सर्वांची एकजूट कामी आली. श्री. हिरे यांनी स्वत: निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळाले. श्री. हिरे यांच्याकडून मतदारांना मोठ्या अपेक्षा आहेत.

प्रस्थापितांना अस्मान दाखवितांना मतदारांनी मावळते सभापती राजेंद्र जाधव व उपसभापती सुनील देवरे, ज्येष्ठ नेते मधुकर हिरे यांच्यासह हिरे गटातील युवराज गोलाईत या मातब्बरांचा पराभव केला. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील संदीप पवार, विनोद चव्हाण, राजेंद्र पवार या तरुणांना संधी मिळाली. सर्वपरिचित नंदलाल शिरोळे यांनी आपला बाज कायम राखला. श्री. हिरे यांनी शहराबाहेर जागा घेऊन बाजार समिती करण्याचे स्वप्न दाखविले आहे. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com