MLA Ram Shinde, MLA Rohit Pawar. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde Vs Rohit Pawar : नीरव मोदीशी काही बोलणं झालं होतं का? शिंदेंनी रोहित पवारांना डिवचलं

Pradeep Pendhare

Ahmednagar : कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीवरून भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. काही खोचक सवाल केले आहेत. एमआयडीसीबाबत कधी बैठक घेतल्याचे सांगितले नाही. प्रस्तावीत जमिनीचा सर्व्हे केला नाही. कोणती जागा देणार व ती जागा नेमकी कोणाची होती? हे देखील सांगितले नाही. याबाबत नीरव मोदीशी काही बोलणे झाले होते का?, अशी प्रश्न आमदार प्रा. शिंदे यांनी उपस्थित केली आहेत.

आमदार राम शिंदे एका कार्यक्रमानिमित्ताने नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीवरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आमदार शिंदे म्हणाले, ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे जागा देण्याला विरोध का केला? वनविभागाची जागा का दाखवली? या दोन प्रश्नांची उत्तरे अगोदर आमदार पवार यांनी द्यावीत. मी फोटो काढायला कोठेही गेलो नाही. जागा दाखवण्याचे आवाहन करणारे पत्र समाजमाध्यमांवर फिरले. सर्व नियम पूर्ण करणारी जागा सुचवण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्वांचाच प्रतिसाद मिळाला. आता सर्व्हेही झाला आहे व त्यावर आता उद्योग मंत्रालय आवश्यक ती कार्यवाही करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा 2024 तयारी सर्वच पक्ष करत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे लोकसभेच्या २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला कमी जागा दाखवल्या जात आहेत. तसे सर्व्हे पुढे आले आहेत.

यावर आमदार राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, गुजरात, उत्तर प्रदेश एवढेच नव्हे तर, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीतही भाजपचा पराभव होणार असल्याचे सर्व्हे होते.पण पाचपैकी तीन राज्यात भाजप(BJP) जिंकले. गुजरात आणि उत्तरप्रदेशही जिंकले. त्यामुळे निवडणूक पूर्व सर्व्हे हा फोलपणा आहे.

नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप जिंकणार, असे दाखवले आहे आणि त्याचवेळी मोदींच्याच नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकारची हार होताना दाखवले आहे. त्यामुळे या सर्व्हेत तथ्य नाही व राज्यात महायुती सरकार लोकसभेच्या 45 हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदींशी खर्गेंची तुलनाच शक्य नाही

विरोधकांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरू शकत नाही. देशाची पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यामुळे त्यांची व मल्लिकार्जून खर्गे यांची तुलना होऊच शकत नाही. इंडिया आघाडीत एकमत झाले तरी भाजपला चिंता नाही. मोदी तिसर्‍यांदा मोठ्या मताधिक्याने पंतप्रधान होतील, असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.

नगर जिल्ह्याचे लवकरच नामांतर...

नगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोणाचाही त्याला विरोध नाही. सर्वांची ती अपेक्षा आहे. त्यामुळे जनतेची इच्छा ओळखून सरकार लवकरच याबाबत आवश्यक कार्यवाही करेल, असेही आमदार राम शिंदे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT