Seema Hire sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Seema Hire : एक फेक कॉल अन् भाजपच्या आमदार सीमा हिरेंचे WhatsApp हॅक ; ‘I need your help‘ म्हणत लोकांकडे मागितले पैसे

BJP MLA Seema Hire, WhatsApp Hack : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सीमा हिरे यांना हॅकरने फसवलं. फेक कॉल करत त्यांचे WhatsApp हॅक करु लोकांकडे पैसे मागितले.

Ganesh Sonawane

Nashik Politics : ‘मॅडम, तुमचे कुरिअर आले आहे; मात्र घराचा पत्ता सापडत नाही. एक नंबर पाठवतो, त्यावर कॉल करून पत्ता सांगा,’ असा फोन भाजपच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांना आला, त्यांनी त्यांनी त्या नंबरवर फोन केल्यानंतर प्रतिसाद तर मिळाला नाहीच; परंतु त्यांचे व्हॉट्सअॅप हॅक झाले.

हॅकरने त्यांच्या नावाने अनेकांकडून पैसे मागितले. व्हॉट्सअॅपवरुन मॅसेज केले. मात्र, वेळीच खबरदारी घेतल्यामुळे आमदार सीमा हिरे यांच्या संपर्कातील कोणाचीही आर्थिक फसवणूक झाली नाही. याप्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

आमदार हिरे या मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीसाठी मुंबईत होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने कुरिअर वितरणाच्या बहाण्याने संपर्क साधला. सुरुवातीचा कॉल त्यांनी घेतला नाही.

मात्र, पुन्हा फोन आल्यानंतर यावेळी आमदार सीमा हिरेंनी यावेळी फोन घेतला. त्या व्यक्तीने तुमच्याकडे शॉपिंग पार्सल द्यायचे आहे, तुमचा पत्ता सापडत नाही, संबंधिताने एक मोबाईल क्रमांक पाठवून त्यावर संपर्क साधण्यास सांगितले. घरांतून कोणी ऑनलाइन शॉपिंग केले असेल आणि त्याचे पार्सल आले असेल असे वाटल्याने आमदार हिरे यांनी दिलेल्या नंबरवर पत्ता सांगण्यासाठी फोन केला. परंतु, संबंधिताने हा नंबर कट केला अन् काही क्षणातच हिरे यांचे व्हॉट्सअॅप हॅक केले.

त्यानंतर आमदार हिरे यांच्या संपर्कातील अनेकांना इंग्रजीत ‘I need your help’ अशा स्वरूपाचे संदेश पाठविण्यात आले. संबंधितांनी तातडीने आमदार हिरे यांच्याशी संपर्क साधल्याने प्रकार उघडकीस आला. त्यांनी त्वरित मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

काही क्षणातच आमदार हिरे आणि त्यांचे महेश हिरे यांना फोन सुरू झाले. दिवसभरात तीनशे ते चारशे फोन आले. त्यामुळे ते सतर्क झाले आणि त्यांनी फेसबुकवर आपला व्हॉट्सअॅप नंबर हॅक झाला असून, कोणीही पैसे देऊ नये, असे आवाहन केले. पैसे मागणाऱ्यांना प्रतिसाद देऊ नये. तसेच कोणालाही फसवणुकीचे फोन आल्यास काळजी घ्यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT