Seema Hire Setback : भाजप आमदार सीमा हिरेंना मोठा धक्का, दीराचा दारुण पराभव ; दुसरीकडे कट्टर विरोधकाचा विजय

Yogesh Hire defeat : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसघांच्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांना पालिका निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. त्यांचे दीर योगेश हिरे यांचा दारुण पराभव झाला आहे.
Seema Hire
Seema Hiresarkarnama
Published on
Updated on

Seema Hire brother-in-law defeat : प्रभाग ७ 'ड' मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते आणि भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचे दीर माजी नगसेवक योगेश(मुन्ना) हिरे यांच्यातील सामन्याकडे शहराचे लक्ष लागले होते. आज निवडणुकीचा निकाल लागला. शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हीरे यांचा दारुण पराभव केला आहे.

प्रभागातील उर्वरित भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाचे सुरेश पाटील, हिमगौरी आडके, स्वाती भामरे विजयी झाले. मात्र आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे यांचा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी पराभव केल्याने हा सीमा हिरे यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.

या प्रभागात भाजपच्या तीन्ही आमदारांनी हिरे यांना निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावली होती. त्यामुळे बोरस्ते विरुद्ध हिरे असा दोघांमधील सामना अधिक लक्षवेधी ठरला. परंतु शिवसेनेचे अजय बोरस्ते हे या सामन्यात बाजीगर ठरले असून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश मुन्ना हिरे यांच्या वाट्याला पराभव आला.

दुसरीकडे, आमदार सीमा हिरे यांचा विरोध झुगारुन ज्यांच्या भाजप प्रवेश झाला ते सुधाकर बडगुजर मात्र भाजपच्या तिकीटावर प्रभाग २५ मध्ये निवडून आले आहेत. एकीकडे दीराचा पराभव तर दुसरीकडे कट्टर राजकीय विरोधकाचा विजय असा दुहेरी धक्का सीमा हिरे यांना बसल्याचे बोलले जात असून राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा आहे.

सीमा हिरेंच्या मुलीची माघार....

आमदार सीमा हिरे यांनी आपली मुलगी रश्मी हिरे यांना महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली होती. रश्मी हिरे यांचा व दीर योगेश हिरे अशा दोघांचा कुटुंबातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.

मात्र, आमदार-खासदारांच्या मुलांनी उमेदवारी करु नये असा आदेश भाजप पक्षश्रेष्ठींकडून आल्यानंतर रश्मी हिरे यांचा पत्ता कट झाला. आमदार सीमा हिरे यांना मुलगी रश्मी हिरे यांचा उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com