Sunil Mahajan & Suresh Bhole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप आमदार सुरेश भोळे यांनी एक रस्ताही केला नाही!

भाजपच्या सत्ताकाळात आमदाराने एक रस्ता देखील केलेला नाही, त्यांचा रस्ता दाखवा व बक्षीस मिळवा.

Sampat Devgire

जळगाव : भाजप (BJP) सत्ता काळात कोणतीही कर्जफेड झाली नाही, कोणत्याही रस्त्याचे काम झाले नाही. आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांनी केलेला रस्ता दाखवावा, आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू, असा टोला विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे (Shivsena) नेते सुनील महाजन (Sunil Mahajan) यांनी लगावला. (Shivsena leader Sunil Mahajan criticise BJP MLA Suresh Bhole)

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेतील सत्ताधारी निष्क्रिय असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते व विरोधी पक्षनेते सुनील महाजन म्हणाले, भाजप सत्ता काळात महापालिकेची कोणतीही कर्जफेड झालेली नाही. जिल्हा बँक कर्जाची २००४ मध्ये सेटलमेंट झाली. त्यानुसार दरमहा एक कोटी रुपये २०१९ पर्यंत फेड केली. हुडको कर्जाचे आजही दरमहा तीन कोटी रुपये फेड करीत आहोत, मग यांनी काय केले ते सांगावे. उगाचच कर्जफेडीचा आव आणू नये.

श्री. भोळे यांनी राजकारणासाठी वक्तव्य करून चर्चेत येण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेला सर्व माहिती आहे. त्यांनी भाजपची सत्ता असताना शहरात व अन्यत्रा एक मोठा प्रकल्प किंवा मोठा रस्ता देखील केला नाही. मात्र ते शिवसेनेवर टीका करण्यासाठी काही तरी बोलायचे म्हणून त्यांनी ते वक्तव्य केसे असावे, असे त्यांनी सांगितले.

रस्त्याची कामे झाली नसल्याच्या आरोपाबाबत ते म्हणाले, अमृत योजनेत टक्केवारी झाली, ती कोणी खाल्ली, त्यामुळेच आज या योजनेस उशीर होत आहे. परिणामी, रस्त्यांची कामे होण्यास विलंब होत आहे. आमदार भोळे हे भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या सहवासात राहिले, पण ते आजही महापालिकेत अडकले आहेत. त्यांना आमदारकी कळली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT