Mahesh Hiray, MLA Seema Hiray, CM Devendra Fadanvis, Devyani Pharande & Rahul Dhikle. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis: अखेर भाजपचे आमदार हक्कासाठी एकवटले, थेट मुख्यमंत्र्यांकडेच केले गाऱ्हाने!

Nashik BJP MLAs demand rights in Maharashtra politics: नाशिक शहरातील भाजप आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहूल ढिकले यांनी केली कुंभमेळ्याच्या कामकाजात विश्वासात घेण्याची मागणी.

Sampat Devgire

Nashik BJP Political News: सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत विरोधी पक्षांच्या तक्रारी होत्या. आता याबाबत भारतीय जनता पक्षाचे आमदारही एकवटले आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच आपल्या भावना व्यक्त केल्या.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन आढावा बैठका घेतल्या. बैठकांसाठी स्थानिक कोणत्याही आमदाराला निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यावरून लोकप्रतिनिधींमध्ये खदखद होती.

यापूर्वी खासदार राजाभाऊ वाजे आणि भास्करराव भगरे यांनी तक्रार केली होती. हे दोन्ही खासदार विरोधी पक्षांचे आहेत. आता मात्र सत्ताधारी भाजपचे आमदारच नाराज असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

शहरातील आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले या तिन्ही आमदारांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सिंहस्थ कुंभमेळा नाशिकला होत आहे. मात्र त्यात जिल्ह्याबाहेरच्या आमदारांचा हस्तक्षेप वाढत आहे, अशी खंत या आमदारांनी व्यक्त केली.

तिन्ही आमदारांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात हस्तक्षेप करणारा आमदार कोण? हे नाव माध्यमांना सांगण्याचे टाळले. मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यावरून नवा वाद निर्माण झाला होता.

जळगाव जिल्ह्यातील आमदार सिंहस्थाच्या बैठकीला उपस्थित राहतात. मात्र त्या बैठकीला नाशिकच्या स्थानिक व सत्ताधारी आमदारांनाच बाजूला ठेवले जाते. ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच आमदारांची खंत होती.

याबाबतची नाराजी आता उघडपणे व्यक्त झाली आहे. चाळीसगावचे संबंधित आमदार स्वतःला पालकमंत्री म्हणून मिरवून घेत आहेत. त्यांना यातून कोणता संदेश द्यायचा आहे, अशी विचारणा होऊ लागली आहे.

नाशिक शहरातील तिन्ही आमदारांना सिंहस्थ कुंभमेळ्यासह अनेक कामांमध्ये महत्त्वाचे स्थान नसते. त्याबाबत पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांतही नाराजी होती. आता उशिरा का होईना या आमदारांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येत जाहिर भूमिका घेतली. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT